आईचं दूध बाळाला पुरत नाही, दुध वाढीसाठी आजच या 5 गोष्टींचा आहारात समावेश करा
आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. त्याचप्रमाणे आईची भावना आणि दूध हे मुलासाठी खूप महत्वाचे आहे. आईचे दूध हे मुलासाठी पहिले आणि सर्वोत्तम अन्न मानले जाते. परंतु कधीकधी असे घडते की, काही नवीन मातांना पुरेसे दूध येत नाही. त्यामुळे मूल भुकेने खूप रडू लागतात. त्यावेळी आई खूप काळजीत पडते. या परिस्थितीत काय करावे हे मातांना समजत नाही.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दूध तयार न होण्यासाठी तुमचा आहार मोठ्या प्रमाणात जबाबदार असू शकतो. गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर तुमचा आहार संतुलित आणि पौष्टिक असावा. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला आईचे दुग्ध वाढवण्यात मदत करू शकतात.

बडीशेप
बडीशेप देखील आईचे दूध वाढवण्यास मदत करते. बडीशेपमुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. यासाठी रात्री बडीशेप पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी प्या. दुधाचा पुरवठा वाढला आहे, असे तुम्हाला स्वतःला वाटेल.
मेथी दाणे
नवीन मातांचे दुग्ध वाढवण्यासाठीही मेथी उपयुक्त आहे. मेथीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळते. जे मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी खूप चांगले मानले जाते. मेथीची भाजीही खाऊ शकता. याच्या मदतीने तुम्हाला कॅल्शियम, लोह, बीटा-कॅरोटीन सारखे पोषक घटक मिळू शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेथीचे पाणी किंवा चहा देखील पिऊ शकता.
लसूण
लसूण देखील नवीन मातांसाठी दुध वाढवण्यास मदत करते. दरम्यान यामुळे दुधात दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जेवण आणि सूपमध्ये लसूण खाऊ शकता. लसूण तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करतो.
जिरे
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, नवीन मातांना जिऱ्याचं पाणी प्यायला दिलं जातं. कारण ते फक्त पचनाला गती देत नाही तर दुधाचं उत्पादनही वाढवते.
लापशी
मातांनीही आपल्या आहारात दलियाचा समावेश करावा. ओटमीलमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे नवीन मातांमध्ये दूध उत्पादन वाढते.












Click it and Unblock the Notifications