जिममध्ये घाम गाळूनही वजन वाढतंय? व्यायामानंतरच्या वजन वाढीमागील 'ही' आहेत 5 धक्कादायक कारणे!

Weight Gain After Exercise : अनेकजण वजन कमी करण्याच्या जिद्दीने व्यायामाला सुरुवात करतात. सुरुवातीचे काही दिवस उत्साहात जातात, मात्र काही आठवड्यांनी जेव्हा ते वजन काट्यावर (Weight Scale) उभे राहतात, तेव्हा वजन कमी होण्याऐवजी वाढलेले दिसते. अशा वेळी नैराश्य येणे स्वाभाविक आहे. पण, व्यायाम करूनही वजन का वाढते? ही समस्या नेमकी कुठे आहे? हे समजून घेणे तंत्रशुद्ध फिटनेससाठी अत्यंत आवश्यक आहे.

Weight Gain After Exercise

१. फॅट लॉस विरुद्ध मसल गेन!

फिटनेस तज्ज्ञांच्या मते, वजनाच्या आकड्यापेक्षा शरीराची रचना (Body Composition) महत्त्वाची असते. शरीरातील अर्धा किलो स्नायू विश्रांतीच्या स्थितीतही ७ ते १० कॅलरीज बर्न करतात, तर तेवढीच चरबी केवळ २ ते ३ कॅलरीज जाळते.

जेव्हा तुम्ही व्यायाम सुरू करता, तेव्हा शरीरातील चरबी (Fat) कमी होऊ लागते आणि स्नायूंचे वजन (Muscle Mass) वाढू लागते.

स्नायू चरबीपेक्षा घनतेने जास्त आणि जड असतात. यामुळे तुमचे शरीर पूर्वीपेक्षा अधिक सुडौल आणि फिट दिसू शकते, पण वजन काट्यावरचा आकडा वाढलेला दिसतो. हे लक्षण 'अनफिट' असण्याचे नसून तुम्ही 'फिट' होत असल्याचे आहे.

२. शरीरात पाणी साठून राहणे!

व्यायामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरीर नवीन दिनचर्येशी जुळवून घेत असते. जड व्यायामामुळे स्नायूंमध्ये सूक्ष्म दुखापत (Micro-tears) होते.

ही दुखापत भरून काढण्यासाठी शरीर तिथे पाणी आणि पोषक घटक साठवून ठेवते, ज्याला 'इन्फ्लेमेशन' म्हणतात. यामुळे शरीरात पाणी टिकून राहते आणि तात्पुरते वजन वाढलेले दिसते. घाबरण्याची गरज नाही, कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

३. आहारातील चुका आणि कॅलरीचे गणित

अनेकजण जिममध्ये १ तास घाम गाळतात आणि बाहेर आल्यावर "मी व्यायाम केला आहे" या समजातून जंक फूड किंवा जास्त कॅलरीचे अन्न खातात.

साखरेचा सापळा : व्यायामानंतर घेतले जाणारे अनेक एनर्जी ड्रिंक्स किंवा स्मूदीजमध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असते. यामुळे तुम्ही व्यायामात जेवढ्या कॅलरीज जाळल्या, त्यापेक्षा जास्त कॅलरीज अन्नातून घेता.

संतुलनाचा अभाव : दिवसभर कमी खाणे आणि रात्री अचानक जास्त खाणे यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी बिघडते, परिणामी वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.

४. झोपेचा अभाव: हॉर्मोन्सचे असंतुलन

व्यायाम आणि आहाराइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'झोप'. शरीराला दररोज ७ ते ९ तासांची विश्रांती आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरात 'घरेलिन' (भूक वाढवणारे) आणि 'लेप्टिन' (भूक शमवणारे) या हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे तुम्हाला अस्वास्थ्यकर पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. तसेच, अपुऱ्या झोपेमुळे शरीर व्यायामानंतरची रिकव्हरी करू शकत नाही.

५. व्यायामाची चुकीची पद्धत आणि तीव्रता

केवळ जिममध्ये उपस्थित राहणे पुरेसे नसते. वजन कमी करण्यासाठी व्यायामाची तीव्रता आणि प्रकार यांचा समतोल असणे गरजेचे आहे. दररोज फक्त चालणे किंवा कमी वेगावर ट्रेडमिल वापरणे काही काळानंतर परिणाम देणे थांबवते.

शरीराला आव्हान देण्यासाठी कार्डिओ (Cardio) आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग (Strength Training) यांची सांगड घालणे आवश्यक आहे. जर व्यायामाची तीव्रता योग्य नसेल, तर शरीर अपेक्षेप्रमाणे कॅलरीज जाळणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+