Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'वयाच्या तीशीच्या आत 'हार्टअटॅक' का येतोय? तरुणाईसाठी धोक्याची घंटा! हृदयविकार टाळण्यासाठी 5 उपाय

Why Heart Attack Occurs in age of 30 : तुम्ही पंचविशीत आहात? तिशीत आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! पूर्वी उतारवयात होणारा हृदयरोग हा आता थेट तरुणाईला लक्ष्य करत आहे. गेल्या काही वर्षांत जगभरात आणि भारतातही अगदी कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढले आहे. वाईट जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे होणारा हा 'लाइफस्टाइल डिसऑर्डर' वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.

तरुणांमध्ये दिसणारी हृदयविकाराच्या झटक्याची गंभीर लक्षणे, त्याची ५ प्रमुख कारणे आणि हा जीवघेणा धोका टाळण्यासाठीचे ५ 'गोल्डन रूल्स' म्हणजेच पुर्वउपाययोजना काय आहेत हे आपण जाणून घेऊया.

Why Heart Attack Occurs in age of 30

कमी वयात हार्ट अटॅकची ५ गंभीर लक्षणे

१. अनेकदा गॅस किंवा पोटाचा त्रास समजून दुर्लक्ष केली जाणारी ही लक्षणे, त्वरित ओळखणे आवश्यक आहे. अचानक बेशुद्ध होणे, हृदयाचे ठोके थांबणे आणि त्वरित खाली कोसळणे हेही लक्षणे गंभीर आहेत.

२. छातीत असह्य वेदना: छातीत अचानक आणि तीव्र वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे, जी काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते.

३. जास्त घाम येणे : छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असताना, असामान्य थंड घाम (Cold Sweat) येणे.

४. श्वास घेण्यास त्रास : श्वासोच्छ्वास घेताना अचानक त्रास जाणवणे.

५. मान/जबडा/पाठदुखी : जबडा, मान किंवा पाठीत अचानक जाणवणारी वेदना, विशेषतः पुरुषांमध्ये हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

तरुण वयात हार्ट अटॅकची ५ प्रमुख कारणे

१. अति ताण आणि चिंता : कामाचा ताण, स्पर्धा आणि मानसिक तणावाचे योग्य व्यवस्थापन न करणे.

२. बैठी जीवनशैली : नियमित व्यायामाचा अभाव.

३. अयोग्य, चुकीचा आहार : जंक फूड, जास्त चरबी (Trans/Saturated Fats) आणि मीठाचे (Sodium) अतिसेवन.

४. जास्त वजन / लठ्ठपणा (Obesity): शरीराचे वजन नियंत्रणात नसणे.

५. व्यसने : धूम्रपान (Smoking) आणि मद्यपानाचे (Alcohol) अतिसेवन.

हृदयविकार टाळण्यासाठी ५ 'गोल्डन रूल्स'

१. संतुलित आणि आरोग्यदायी आहार : रोजच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि मासे, कडधान्ये यांसारख्या कमी चरबीयुक्त प्रथिनांचा समावेश करा. मीठ आणि ट्रान्स फॅट्स पूर्णपणे टाळा.

२. नियमित व्यायाम : आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम (उदा. वेगाने चालणे, पोहणे) करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

३. धूम्रपान आणि मद्यपान नकोच : ही व्यसने रक्तवाहिन्या अरुंद करतात आणि धोका वाढवतात. ती त्वरित बंद करा.

४. वजन आणि ताण नियंत्रण : तुमचे वजन (Weight) निरोगी ठेवा. योगा, ध्यान आणि दीर्घ श्वासोच्छ्वास तंत्राचा वापर करून तणाव कमी (Stress Management) करा.

५. आरोग्य निरीक्षण (Monitoring) : आपला रक्तदाब (Blood Pressure) आणि साखरेची पातळी (Diabetes) नियमितपणे तपासा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+