Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुरेशी झोप होऊनही दुसऱ्या दिवशीही कायम राहते सुस्ती, मग सावधान! तुम्हाला असू शकतो हा गंभीर आजार!

Health Tips in Marathi News : हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. कोणाला शुगर तर कोणाला अचानक हार्ट संदर्भातील आजाराला सामोरे जावे लागत आहेत. तर कोणता आजार कोणत्या वयातील लोकांना कधी होईल, याबाबत तर काहीच सांगता येत नाही. एकंदरीतच, यासर्वामागे एकमेव कारण आहे, बदलती जीवनशैली. आहारामध्ये झालेला बदल. अशातच, आजकाल लहान शाळकरी मुलांपासून ते वृद्धापर्यंत झोपेच्या संदर्भातील देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही अनेकांना दिवसा देखील त्यांच्या अंगात सुस्ती असल्याच्या तक्रारी हल्ली वाढल्या आहेत. कामाच्या ठिकाणी अनेकांना झोप येते, वारंवार डोळे लागतात. शरीर थकल्यासारखे वाटते. बऱ्याचदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पण हे एका गंभीर आजाराचे लक्षण आहे,

यावर वेळीच काळजी घेतली नाही तर मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे आजच्या या लेखात आपण दिवसांही वारंवार झोप का येते, रात्रीची शांत झोप का होत नाही, यासह वारंवार अशीच समस्या राहिली तर पुढे काय परिणाम होतात, याविषयी जाणून घेणार आहोत..!

Hypersomnia symptoms details

दिवसाही वारंवार झोप येतेय,..मग ही आहे समस्या!

रात्री जर व्यवस्थित झोप झालेली नसेल तर दिवसा झोप येणे सहजच गोष्ट आहे. पण जर तुम्हाला रात्री योग्य झोप येत असेल, तरी देखील दिवसा तुमचे डोळे वारंवार बंद होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हे हायपरसोम्नियामुळे होऊ शकते. या स्थितीत, व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त झोप वाटते. वाईट सवयी आणि आजार हे हायपरसोम्नियाचे काही प्रमुख कारण आहेत. त्यामुळे वेळीच त्यात बदल करण्याची गरज असते.

ही कारणे असू शकतात

  • दारू सेवन

जास्त दारू पिल्याने झोपेवर परिणाम होतो. यामुळे दिवसा वारंवार झोप येण्याची समस्या उद्भवू शकते.

  • कमकुवत स्नायू

जर शरीरातील स्नायू कमकुवत असतील तर वारंवार झोप येण्याची समस्या दिसून येते.

  • रात्री योग्य झोप न येणे

रात्री पुरेशी झोप न घेतल्याने देखील ही समस्या उद्भवू शकते. यामुळे हायपरसोम्नियाचा धोका वाढू शकतो.

  • औषधांचे दुष्परिणाम

कधीकधी औषधाच्या परिणामामुळे हायपरसोम्निया देखील होऊ शकतो. या काळात जास्त झोप येते.

  • मधुमेह

शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने हायपरसोम्निया होऊ शकतो. मधुमेहात शरीर ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही, ज्यामुळे थकवा आणि झोपेचा त्रास होतो. वारंवार तहान लागणे, लघवी होणे आणि वजन कमी होणे ही त्याची इतर लक्षणे आहेत.

  • थायरॉईड

हायपोथायरॉईडीझममध्ये, थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होतो. त्याचा चयापचयावर परिणाम होतो. यामुळे आळस, थकवा आणि जास्त झोपेची समस्या वाढते. वजन वाढणे, थंडी वाटणे आणि केस गळणे ही त्याची लक्षणे असू शकतात.

  • अशक्तपणा

अशक्तपणामध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे थकवा आणि झोपेचा त्रास वाढतो. हे लोह, व्हिटॅमिन बी १२ किंवा फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

  • स्लीप एपनिया

स्लीप एपनिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान वारंवार श्वास थांबतो, ज्यामुळे खोल आणि शांत झोप येत नाही. यामुळे दिवसा जास्त झोप, थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रतेचा अभाव यासारखी लक्षणे दिसू शकतात.

काय असतात त्याची प्राथमिक लक्षणे?

  • चिंता आणि ताण
  • चिडचिड
  • दिवसा वारंवार झोप येणे
  • थकवा जाणवणे
  • राग येणे
  • सकाळी उठण्यास त्रास होणे
  • डोकेदुखी
  • भूक न लागणे
  • गोष्टी विसरणे
  • बेचैनी वाटणे
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+