सावधान! RSV मुळे दरवर्षी 1 लाख बालकांचा मृत्यू; WHOने सांगितली लसीकरणाची योग्य वेळ अन् उपाय
Respiratory Syncytial Virus vaccine timing : लहान मुलांच्या आरोग्यासाठी रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) हा जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अर्थात डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, 5 वर्षांखालील सुमारे 33 दशलक्ष मुलांना दरवर्षी याचा संसर्ग होतो. ज्यापैकी सुमारे 1,00,000 मुलांचा मृत्यू होतो. यातील धक्कादायक बाब म्हणजे 97% मृत्यू हे विकसनशील देशांमध्ये होतात. या गंभीर आजाराला रोखण्यासाठी लसीकरण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे.

RSV म्हणजे काय, तो इतका घातक का आहे?
RSV हा श्वसनमार्गाला संक्रमित करणारा विषाणू आहे. तो खोकला, शिंका किंवा थेट संपर्कातून वेगाने पसरतो.
प्रौढांसाठी : हा केवळ सामान्य सर्दी-खोकल्यासारखा असतो.
बालकांसाठी : 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये यामुळे ब्रॉन्कायओलायटिस आणि न्यूमोनिया सारखे गंभीर आजार होऊन श्वसनास अडथळा निर्माण होतो.
धोक्याची लक्षणे : जर बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत घरघर येत असेल, किंवा ओठ निळे पडत असतील, तर विलंब न करता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
लस कधी आणि कोणाला द्यावी?
WHO ने हा आजार रोखण्यासाठी दोन मुख्य मार्ग सुचवले आहेत.
अ) गर्भवती महिलांसाठी लसीकरण:
वेळ : गर्भधारणेच्या २८ व्या आठवड्यापासून किंवा त्यानंतर ही लस दिली जाऊ शकते.
फायदा : आईच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज प्लेसेंटाद्वारे बाळाला मिळतात. यामुळे जन्मानंतर पहिल्या ९० दिवसांत संसर्गाचा धोका ८० टक्क्यांनी कमी होतो.
ब) नवजात मुलांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडी:
पर्याय: 'निरसेविमाब' (Nirsevimab) नावाचे इंजेक्शन.
वेळ: जन्मानंतर लगेच किंवा आरसीव्हीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी.
फायदा: एकच डोस साधारण ५ महिन्यांपर्यंत बाळाला संरक्षण देतो.
प्रतिबंधात्मक उपाय: पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
केवळ वैद्यकीय उपचारच नाही, तर दैनंदिन आयुष्यात खालील गोष्टी पाळून तुम्ही तुमच्या बाळाचा बचाव करू शकता.
- उपाय : कृती
- स्वच्छता : बाळाला स्पर्श करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा.
- सामाजिक : अंतर बाळाला गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळा आणि आजारी लोकांपासून दूर ठेवा.
- स्तनपान : बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य स्तनपान आवश्यक आहे.
- सल्ला : गर्भवती महिलांनी आपल्या डॉक्टरांशी आरसीव्ही लसीबद्दल आगाऊ चर्चा करावी.












Click it and Unblock the Notifications