Shah Rukh Khan Diet: 59व्या वर्षीही शाहरुख खान तरुण आणि तंदुरुस्त कशामुळे दिसतो? हे गुपित घ्या जाणून
Shah Rukh Khan Diet : डर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कल हो ना हो, मैहुना आदी एकापेक्षा एक सरस आणि सुपरहिट चित्रपटात दमदार अभिनय करणारा सर्वांचा आवडता किंग खान अर्थात शाहरुख खान साठीत पोहचला आहे. 59 व्या वर्षीही तो तंदुरुस्त आणि तरुण दिसतो.
शाहरुख खानची ऊर्जा आणि त्याचे शरीरच नाहीतर मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वासाने त्याचे वय जरी साठीत पोहचले असले तरीही तो तरुण दिसतो ही गोष्ट सहज झालेली नाही,यामागे काही खास पथ्थ्य आहेत जी शाहरुख खानने आतापर्यंत पाळली आहेत. जी त्याने आपल्या मुलाखतीत उलगडली आहेत.

शाहरुख खानने त्याच्या मुलाखतींमध्ये अनेकदा त्याच्या फिटनेसचा उल्लेख केला आहे, परंतु अलीकडेच एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आहार आणि जीवनशैलीबद्दल उघडपणे बोलताना दिसत आहे. ही मुलाखत सुमारे आठ वर्षांपूर्वी आरजे देवांगणाची होती ज्यामध्ये शाहरुखने त्याच्या रात्रीच्या व्यायामाच्या दिनचर्येबद्दल आणि साध्या खाण्याच्या सवयींबद्दल सांगितले आहे.
शाहरुखचा आहार यामागील एक कारण
सुमारे 8 वर्षांपूर्वी, शाहरुख खानने आरजे देवांगणाशी त्याच्या आहाराबद्दल मत व्यक्त केले होते. या दरम्यान, अभिनेत्याने हे देखील उघड केले की, तो कोणत्याही प्रकारच्या डाएट प्लॅनचे पालन करत नाही, सुपरस्टार म्हणाला, "मी नैसर्गिकरित्या खूप मूलभूत अन्न खातो. मी दररोज दोन मुख्य जेवण करतो, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण, याशिवाय, मी स्नॅक्स किंवा इतर काहीही खात नाही. मला चमचमीत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आवडत नाहीत.
मी स्प्राउट्स, ग्रील्ड चिकन, ब्रोकोली आणि कधीकधी मसूर खातो. मी अनेक वर्षांपासून दररोज अशा प्रकारचे अन्न खात आहे.
शाहरुख खान फक्त पाच तास झोपतो...
शाहरुख खान फक्त पाच तास झोपतो. हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण तो स्वतः म्हणतो की तो इतक्या वर्षांपासून ही दिनचर्या पाळत आहे आणि त्याला त्यात कोणतीही अडचण नाही. तो रात्री व्यायाम करतो आणि त्याचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करतो.
शिस्त आणि साधेपणा जीवनाचा भाग
'पठाण' चित्रपटात शाहरुखची अद्भुत बॉडी आणि अॅब्स पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले की वयाची 50 वर्षे ओलांडल्यानंतरही कोणी इतके तंदुरुस्त कसे राहू शकते. पण याचे उत्तर शाहरुखच्या साध्या पण शिस्तबद्ध जीवनशैलीत लपलेले आहे. त्याच्या साध्या आणि संतुलित आहाराने हे सिद्ध केले आहे की केवळ महागड्या आहार योजना किंवा पूरक आहारांनीच नव्हे तर शिस्त, साधेपणा आणि सतत कठोर परिश्रमानेच तंदुरुस्ती राखता येते.












Click it and Unblock the Notifications