Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भिजवलेले अंजीर की खजूर काय आहे फायदेशीर; आरोग्यासाठी कोणते चांगले, जाणून घ्या- फायदे अन् तोटे

What is the benefit of soaked figs or dates Which is good for health : आरोग्याच्या बाबतीत अंजीर आणि खजूर दोन्ही पदार्थ अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आरोग्यवर्धक पदार्थ म्हणून या दोन्ही ड्रायफ्रुट्सकडे पाहिले जाते. या अंजीर व खजूरचे आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगितले गेले आहेत.

हे दोन्ही ड्राय फ्रूट थंडावा निर्माण करणारे पदार्थ मानले जातात. पित्त दोष कमी करण्यास मदत करतात. दोन्ही बहुतेक भारतीय घरांमध्ये भिजवून खाल्ले जातात. भिजवले अंजीर आणि भिडवलेले खजूर दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, परंतु त्याचे फायदे हे वेगवेगळे आहेत. ते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार फायदेशीर ठरतात, चला तर जाणून घेऊया, भिजवलेले खजूर की भिजवलेले अंजीर फायदेशीर आहेत.

soaked figs or dates

भिजवलेल्या अंजीरचे फायदे

पचनसंस्थेसाठी चांगले: भिजवलेल्या अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

हाडांची मजबुती: यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते : भिजवलेल्या अंजीरमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, ज्यामुळे ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त : कमी कॅलरीजमुळे, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी भिजवलेले अंजीर फायदेशीर ठरू शकते.

भिजवलेल्या खजुराचे फायदे

त्वरीत ऊर्जा मिळते : भिजवलेल्या खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते, जी त्वरित ऊर्जा प्रदान करते. हे कसरत करण्यापूर्वी किंवा थकवा दूर करण्यासाठी खाल्ले जाऊ शकते.

हृदयासाठी फायदेशीर : खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

अँटिऑक्सिडंट्स भरपूर : खजूरमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

हिवाळ्यात फायदेशीर : खजुरांचा तापमानवाढीचा प्रभाव असतो, त्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास मदत होते.

तुमच्यासाठी काय चांगले आहे?

जर तुम्हाला पचन सुधारायचे असेल, वजन नियंत्रित करायचे असेल किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर भिजवलेले अंजीर तुमच्यासाठी चांगले असू शकते. जर तुम्हाला लवकर ऊर्जा हवी असेल, हृदयाचे आरोग्य सुधारायचे असेल किंवा थंडीत उबदारपणा हवा असेल तर भिजवलेल्या खजूर अधिक फायदेशीर ठरतील.

अर्थात भिजवलेले अंजीर पचन, वजन आणि रक्तातील साखरेसाठी फायदेशीर मानले जाते. भिजवलेले खजूर हिवाळ्यात ऊर्जा, हृदय आणि उबदारपणासाठी चांगले मानले जाते. दोन्ही मर्यादित प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, हे ही तितकेच महत्त्वाचे समजून घेतले पाहिजे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+