Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सूर्यकुमार यादववर यशस्वी सर्जरी, त्याला झालेला स्पोर्ट्स हर्निया काय आहे? खेळाडूंना का होतो हा आजार

What is sports hernia : भारताने इंग्लडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत ठेवण्यात यश मिळवले. भारतीय संघात टीम इंडियाचा धुरंधर फलंदाज सूर्यकुमार यादव याची कमतरता खूप जाणवली, पण सूर्या या स्पर्धेत का खेळला नाही, याची सर्वांनाच माहिती आहे असे नाही. सूर्यकुमार यादवचे नुकतेच एक ऑपरेशन झाले आहे, आणि त्यातून तो आता बराही झाला आहे.

भारतीय टी-20 संघाचा सूर्यकुमार यादव हा कर्णधार आहे. त्याला अलिकडे एका खेळासंबंधीत गंभीर आजाराला सामोरे जावे लागले. वैद्यकीय भाषेत त्याला स्पोर्ट्स हर्निया म्हटले जाते. सूर्याची जुलै 2025 मध्ये शस्त्रक्रिया झाली आहे. आता तो मैदानात उतरत आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याने बंगरूळूच्या सेंटर ऑफ एक्सलंस येथे सराव केला आहे.

What is sports hernia

येत्या 9 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धा आहे आणि तो या स्पर्धेत खेळेल अशी आशा आहे. सूर्याला स्पोर्ट्स हर्निया झाला होता, हा आजार नेमका काय आहे हे जाणून घेऊया.

हर्निया म्हणजे काय? (What is sports hernia)

स्पोर्ट्स हर्निया, ज्याला 'अ‍ॅथलेटिक प्युबल्जिया' असेही म्हणतात, ही पारंपारिक हर्नियापेक्षा वेगळी आहे. यामध्ये पोटाच्या खालच्या भागात किंवा कंबरेतील स्नायू, कंडरा किंवा अस्थिबंधनांवर ताण येतो किंवा ते अंशतः फाटतात.

कोणाला होते, ही दुखापत?

मुख्यतः वेगाने धावणारे, अचानक दिशा बदलणारे किंवा फुटबॉल, क्रिकेट, हॉकी यांसारख्या खेळांमध्ये सहभागी असणाऱ्या खेळाडूंना हा आजार होतो. सूर्यकुमार यादवला याच दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली.

स्पोर्ट्स हर्नियाची प्रमुख लक्षणे

वेदना: खालच्या पाठीत किंवा कंबरेच्या भागात वेदना होतात, ज्या खेळांदरम्यान वाढतात.

प्रसार: वेदना मांडीच्या आतील भागात पसरतात.

हालचालीवर परिणाम: दिशा बदलताना किंवा जलद हालचाल करताना अडचण येते.

सूज: दुखापत झालेल्या भागात सूज आणि कोमलता जाणवते.

खेळाडूंमध्ये हा आजार सामान्य का आहे?

खेळाडूंमध्ये स्पोर्ट्स हर्निया सामान्य असण्याची काही प्रमुख कारणे:

खेळांची पद्धत: फुटबॉल, क्रिकेट, रग्बी यांसारख्या खेळांमध्ये अचानक थांबणे, वेगाने वळणे किंवा धावणे यांचा समावेश असतो. यामुळे स्नायूंवर जास्त ताण येतो.

स्नायूंची कमतरता: पोट आणि कंबरेच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा असंतुलन असल्यास ही दुखापत होण्याची शक्यता वाढते.

वॉर्म-अपचा अभाव: खेळापूर्वी योग्य प्रकारे वॉर्म-अप न केल्यामुळे स्नायू दुखापतीसाठी अधिक संवेदनशील बनतात.

स्पोर्ट्स हर्नियावरील उपचार

यावर उपचार घेण्यासाठी स्थितीच्या तीव्रतेनुसार विविध पर्याय उपलब्ध आहेत:

विश्रांती: सुरुवातीच्या काळात विश्रांती, बर्फ लावणे आणि वेदनाशामक औषधे वापरून आराम मिळतो.

फिजिओथेरपी: स्नायूंना बळकटी देणारे आणि लवचिकता वाढवणारे व्यायाम करणे.

शस्त्रक्रिया: जेव्हा वेदना तीव्र असतात आणि इतर उपायांनी आराम मिळत नाही, तेव्हा शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरते.

स्पोर्ट्स हर्निया टाळण्यासाठी काय कराल?

नियमित व्यायाम: पोट, कंबर आणि कोर स्नायूंना बळकट करणारे व्यायाम करा.

स्ट्रेचिंग: लवचिकता वाढवण्यासाठी नियमित स्ट्रेचिंग करा.

वॉर्म-अप: कोणत्याही खेळ किंवा व्यायामापूर्वी योग्य वॉर्म-अप करा.

योग्य तंत्र: खेळांमध्ये योग्य तंत्र आणि पद्धतींचा अवलंब करा.

आराम आणि पोषण: स्नायूंच्या आरोग्यासाठी संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि पुरेशी झोप घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+