Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करताय का?, मग तुमच्या शरीरावर होईल विपरित परिणाम, वेळीच काळजी घ्या

How harmful is sitting for too long : हल्ली प्रत्येक क्षेत्रामध्ये टारगेटपूर्ण करण्यासाठी तास-न-तास कामे केली जातात. ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असतो. कर्मचाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एकाच जागी तासन् तास बसून ते पूर्ण करावेच लागते. काम तर पूर्ण होणारच पण त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो.

तुम्हाला माहिती आहे की, एकाच जागी बसून सतत काम केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे एकाच जागी तासन् तास बसण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. एका अभ्यासानुसार असे दिसून आले की, एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. त्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Health News

वजन वाढण्याचा धोका

दिवसभर एकाच जागेवर बसून काम केल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होत नाहीत, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जास्त वेळ बसून राहिल्याने इन्सुलिन हार्मोन्सची रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त राहून लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.

हाडे कमकुवत होतात

दिवसभर बसून राहून कोणतीही हालचाल न केल्याने संध्याकाळच्या वेळी हाडांवर वाईट परिणाम होतात. जास्त काळ स्थिर राहिल्याने, हाडांची घनता कमी होते आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. तसेच हाडांची वाढ थांबल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो.

कर्करोगसंबंधी समस्या उद्भवतात

जास्त वेळ बसल्याने कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. जर एखादी व्यक्ती बर्याच काळासाठी राहते. परंतु, दिवसभरात व्यायाम, नृत्य, खेळ इत्यादी कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया न केल्यास, हृदयविकार, कर्करोग आणि इतर आजार होण्याचा धोका जास्त असतो.

हृदयाची समस्या वाढते

शरीरात सतत तणावामुळे शरीरात सक्रिय आराम मिळत नाही. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तसेच हृदयविकाराशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मधुमेहाचा वाढतो धोका

सतत एकाच जागेवर बसल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. यामुळे टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. ऑफिसमध्ये जास्त वेळ जागे बसून काम केल्याने पाठ दुखणे, पाठदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.

वर्क फ्रॉम करताना काय काळजी घ्यावी

वर्क फ्रॉम होममुळे कामाचा ताण वाढत असल्याची तक्रार अनेक जण करत आहेत. शारीरिक तसंच मानसिक ताणतणाव वाढल्यानं अन्य आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे आपल्या हृदयावरही ताण येतो. हृदय विकाराशी संबंधित आजारांचा धोका टाळण्यासाठी तुम्ही आपल्या हृदयाच्या गरजा जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. यातही एकाच ठिकाणी तास-न्-तास बसून काम करणाऱ्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. तासनतास बसल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते त्याचा परिणाम हृदयावरही व्हायला लागतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+