Health Tips:तुमच्या चेहऱ्यावर जर ही लक्षणे दिसली तर सावधान,बॉडीत वाढले कोलेस्ट्रोल, करू नका दुर्लक्ष
उच्च कोलेस्टेरॉल हा एक सायलेंट किलर आजार म्हणून ओळखला जातो. त्याची लक्षणे चेहऱ्यापासून ते तुमच्या संपूर्ण शरीरात दिसायला लागतात. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वेळीच जर त्याची काळजी घेतली नाही, उपाय केले नाही, तर भविष्यात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
तुम्ही जर निष्काळजीपणा केला तर तो मोठा महागात पडू शकतो. ती गंभीर आरोग्य समस्यांचे कारण बनू शकते. चला तर जाणून घेऊया की, आपल्या शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात. जी पाहून आपण शरीरात कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाबद्दल सतर्क होऊ शकतो.

डोळ्यांभोवती पिवळे डाग येणे
डोळ्यांभोवती किंवा आजूबाजूला पिवळे डाग दिसतात. जर असे असेल तर ही स्थिती झेंथेलास्मा असू शकते. हे डाग बहुतेकदा शरीरात उच्च पातळीचे कोलेस्टेरॉल दर्शवतात. चेहऱ्याच्या रंगात बदल, पापण्यांवर पिवळे डाग देखील याकडे निर्देश करतात.
कॉर्नियामध्ये होतात हे बदल
डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती हलक्या रंगाचे रिंग तयार झालेले दिसले तर सावधगिरी बाळगली पाहिजे. डोळ्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते. ते दृष्टीला हानी पोहोचवू शकते.
सतत थकवा जाणवणे
शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने धमन्या ब्लॉक होण्याचा धोका वाढतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनसह रक्त परिसंचरण योग्यरित्या होत नाही. ज्यामुळे हृदयाला त्रास होऊ लागतो. शरीर थकलेले आणि सुस्त वाटते.
त्वचेवर होतोय बदल
कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे त्वचेवर कोरडेपणासह खाज सुटण्याची समस्या दिसून येते. निळे आणि जांभळे रंगाचे डाग तयार होतात, जे रक्ताभिसरण प्रभावित झाल्याचे लक्षणे दर्शवितात.
डोके आणि पाय दुखणे
रक्तप्रवाह प्रभावित झाल्यामुळे डोके आणि पाय दुखण्याच्या तक्रारी दिसून येतात. त्यावेळी समजून घ्या की, तुमच्या बॉडीमध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल वाढले आहे.
पोट, छाती दुखणे तसेच श्वास घेण्यास त्रास
शरीरात वाढलेले कोलेस्टेरॉल पचनसंस्थेवर परिणाम करते. त्यामुळे फुफ्फुसे आणि हृदयावरही दबाव वाढतो. त्यामुळे छातीत दुखण्यासोबतच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
कोलेस्टेरॉल वाढण्याची काय आहेत कारणं..!
- जंक फूडचे जास्त सेवन
- शारीरिक हालचालींपासून दूर राहणे
- जास्त वजन आणि लठ्ठपणा
- दारू आणि सिगारेटचे सेवन
- अनेक प्रकरणांमध्ये, शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यामागील कारण देखील अनुवांशिक असू शकते.
तुम्ही अशा प्रकारे ते रोखू शकता
- संतुलित आहार घ्या. आहारात हिरव्या भाज्या, फळे, काजू आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
- दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. यामुळे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत होईलच, शिवाय कोलेस्टेरॉलचा धोका कमी होण्यासही मदत होईल.
- धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा.
- मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग आणि ध्यान करा.
- कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी तपासणी करत रहा.
- जर कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वाधिक उचित राहिल.












Click it and Unblock the Notifications