Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तरुणपणी का येतोय हार्ट अटॅक? हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी या गोष्टी टाळा, काय खावे काय नको, जाणून घ्या

What are the causes of heart attacks in youth : हार्ट अटॅक अन् हृदयरोग हा असा आजार आहे की, तो थोडाही वेळ देत नाही पण हा आजार आधी संकेत देत असतो पण आपण त्याकडे फारसे लक्ष देतोच असे नाही. आपले एक दुर्लक्ष आपल्याला मृत्यूच्या जबड्यात नेण्यासाठी पुरेसे आहे. अलिकडे तरुणपणीच हार्ट अटॅक येण्याची उदाहरणे दिसतात.

हार्ट अटॅकचा खासकरुन चाळीशीनंतर जास्त धोका असला तरीही अगदी पंचवीशी तिशीत हार्ट अटॅक येत आहेत. आपले खानपान, जीवनशैली आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामध्ये सर्व या आजाराचे मुळ लपलेले आहे. मुळातः याच गोष्टीकडे आपण सजगतेने बघत नाही. त्यामुळे आपल्यावर हे आरोग्याचे संकट ओढवते.

What are the causes of heart attacks in youth

जर तुम्हाला हृदयरोगासंबंधी त्रास असेल किंवा तुमच्या घरात कुणी हृदयरोगी असेल तर तु्मच्यासाठी ही बातमी महत्वाचीच आहे कारण हृदयरोगाची कारणे, हृदयरोगींनी काय खावे आणि खाय खाऊ नये, यासंदर्भात तज्ज्ञांनी जे सल्ले दिले त्यानुसार, आम्ही आपल्याला माहती देत आहोत.

सर्वप्रथम आपण समजून घ्यायला हवे की, हृदयरोग हा खासकरुन जीवनशैलीचा आजार आहे. आपल्या वाईट सवयी जेव्हा शिखरावर पोहचतात, त्यावेळी हृदयरोगाची जाणीव व्यक्तीला होते, एवढेच नाहीतर हार्ट अटॅकचा झटकाही येऊन जातो पण कळतही नाही, तर कधी उच्च रक्तदाब आणि इतर व्याधींची जाणीव आपल्याला होते. या अशा व्याधी आहेत ज्या कधी आपल्याला चिटकतील हे सांगता येत नाही.

तरुण वयात हार्ट अटॅकची काय आहेत कारणे?

  • तरुण वयात हृदयविकाराची अनेक कारणे असू शकतात, जी प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित असतात.
  • या कारणांमध्ये तणाव, खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, जास्त वजन आणि दारू आणि धूम्रपानाचे व्यसन यांचा समावेश होतो.
  • या सवयींचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.
  • योग्य खाणे, नियमित व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन करून हे धोके कमी केले जाऊ शकतात.

चाळीशीत हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ही काळजी घ्या

संतुलित आहार : तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त प्रथिने जसे की मासे आणि कडधान्ये यांचा समावेश करा.

मीठ टाळा : सोडियम (मीठ) चे सेवन कमी करा आणि ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स टाळा, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

नियमित व्यायाम : आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम व्यायाम करा, जसे की वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे. यामुळे हृदयाचे ठोके मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

तुमचे वजन नियंत्रणात ठेवा : जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. निरोगी वजन राखल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा : धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.

तणाव कमी करा : मानसिक तणाव हे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारण बनू शकते. योग, ध्यान, दीर्घ श्वास आणि योग्य वेळी विश्रांती घेतल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

रक्तदाब आणि साखरेचे निरीक्षण करा : उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तुमचा रक्तदाब आणि साखरेची पातळी नियमितपणे तपासा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+