Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वर्कआऊटनंतर गरम की थंड पाण्याने आंघोळ करावी?, काय सांगतात तज्ज्ञ,फायदा अन् तोटा काय होतो?

Cold Vs Hot Showers For Muscle Recovery : जबरदस्त वर्कआऊट किंवा व्यायामानंतर शरीरातील स्नायू ताणले जातात. स्नायूंच्या मजबुतीसाठी प्रथिने आहार जितका महत्त्वाचा आहे तितकाच शॉवर अर्थात आंघोळ देखील तितकीच महत्त्वाची आहे. अनेकांना वर्कआउटनंतर गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते, तर काहींना थंड पाण्याने आंघोळ करायला आवडते.

वर्कआउटनंतर आंघोळीसाठी पाण्याचे तापमान तुमच्या शरीराची आवड आणि शरीराचा प्रकार आणि फिटनेस यावर अवलंबून असते. दोन्ही शॉवरचे स्वतःचे फायदे आहेत, फिजिओथेरपिस्ट पूजा चौधरी यांनी बोल्ड स्कायशी संवाद साधताना काही गोष्टीबाबत नेमकी कोणत्या पाण्याने आंघोळ करावी याबाबत सांगितले आहे.

Cold Vs Hot Showers For Muscle Recovery

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे काय?

स्नायूंची सूज कमी करते: थंड पाणी रक्तवाहिन्या आकुंचन पावते, ज्यामुळे सूज आणि स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो.

ऊर्जा वाढते : थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीर ताजेतवाने होते आणि तुम्हाला लवकर थकवा जाणवत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते : थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

स्नायूंना आराम देते : कोमट पाणी स्नायूंना आराम करण्यास आणि कडकपणा कमी करण्यास मदत करते.

तणाव कमी होतो : कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीर आणि मन शांत होते.

रक्ताभिसरण सुधारते : गरम पाणी रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे थकवा कमी होतो.

थंड आणि गरम पाणी मिळून आंघोळ करा

दररोज एकामागून एक पर्यायी गरम आणि थंड पाणी वापरणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे रक्तसंचरण प्रक्रिया सुधारते आणि जलदगतीने मदत करते. तुमच्या शरीराच्या गरजा आणि ऋतू लक्षात घेऊन निर्णय घ्या. काही आरोग्य समस्या असल्यास. डॉक्टरांना जरून सल्ला घेणे गरजेचे आहे.

कोणता पर्याय निवडायचा?

थंड पाणी : जर व्यायाम खूप तीव्र असेल आणि स्नायू सुजले असतील किंवा दुखत असतील, तर थंड पाण्याने आंघोळ केली तर अधिक चांगले ठरू शकते.

गरम पाणी: जर तुम्हाला आराम करायचा असेल आणि व्यायामानंतर विश्रांतीची गरज असेल, तर गरम पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+