Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Health Tips : 'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, प्रोस्टेट कर्करोगाची असू शकतात ही चिन्हे!

Health Tips : प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे, जो अनेकदा शांतपणे शरीरात वाढतो आणि जेव्हा त्याची लक्षणे स्पष्ट होतात, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात या लक्षणांकडे लक्ष दिल्यास आणि योग्य वेळी निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. ५० वर्षांवरील पुरुषांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण अधिक असले तरी, सध्या तरुणांमध्येही त्याची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने या लक्षणांबद्दल जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

What are symptoms of prostate cancer

प्रोस्टेट कर्करोगाची प्रमुख लक्षणे

लघवीमध्ये अडचण

प्रोस्टेट ग्रंथीतील वाढीमुळे मूत्रमार्गावर दाब येतो, ज्यामुळे लघवी करताना जळजळ होणे, थेंब-थेंब लघवी होणे किंवा वारंवार लघवीला जावे लागणे यांसारख्या समस्या येतात.

रात्री वारंवार लघवी

जर तुम्हाला रात्री दोनपेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावे लागत असेल आणि हे नियमित होत असेल, तर हे प्रोस्टेटशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते.

लघवी किंवा वीर्यात रक्त

हे एक गंभीर लक्षण आहे, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. लघवी किंवा वीर्यात रक्ताचे अंश दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पाठ, मांडी किंवा कमरेत सतत वेदना

कर्करोग वाढू लागल्यास तो हाडांपर्यंत पसरतो, ज्यामुळे पाठ, मांडी आणि कमरेमध्ये सतत वेदना जाणवतात.

अचानक वजन घटणे अन् भूक न लागणे

जर कोणताही आहार किंवा व्यायाम न करता तुमचे वजन कमी होत असेल आणि भूकही लागत नसेल, तर हे प्रोस्टेट कर्करोगाचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.

प्रोस्टेट कर्करोग टाळण्यासाठी उपाय

नियमित तपासणी

50 वर्षांनंतर, दरवर्षी पीएसए (PSA) चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा, या सवयींमुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

आरोग्यदायी आहार

जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळून हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

नियमित व्यायाम

शारीरिक हालचाल आणि वजन नियंत्रणात ठेवल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.

वरीलपैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला दीर्घकाळ जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार केल्यास या गंभीर आजारापासून बचाव करणे शक्य आहे.

(विशेष सूचना- ही माहिती विविध स्त्रोतावरुन घेतलेली आहे, आरोग्याचा कोणताही सल्ला यातून देण्यात आलेला नाही, उपचारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+