ग्रीन-टी जितकी आरोग्यासाठी फायद्याची आहे, तितकीच अतिसेवनाने ठरू शकते जीवघेणी, जाणून घ्या सविस्तर
Benefits and disadvantages of drinking green tea : काही लोकांना ग्रीन टी पिणे म्हणजे फक्त वजन कमी करण्यासाठीच पिणे असं वाटत असते. परंतु हा गैरसमज असून ग्रीन टी चे इतरही अनेक फायदे आहेत.
आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखली जाणारी ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी तर एक लोकप्रिय पर्याय आहेच, पण प्रश्न असा पडतो की वजन कमी करण्यासाठी किती दिवस ग्रीन टी प्यावी? ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील चयापचय वाढवतात.
हे शरीरातील चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देते आणि वजन कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबबर अति ग्रीन टी प्यायल्यास ती शरीराला लाभदायी होण्यापेक्षा विनाशकारी देखील होऊ शकते. चला तर जाणून घेऊया, ग्रीन टी पिण्याचे फायदे अन् तोटे आहेत तरी काय?

ग्रीन टी पिण्याचे इतर काही फायदे जाणून घेऊ
1. चयापचय वाढवते :
ग्रीन टीमधील कॅटेचिन शरीराची चयापचय वाढवतात, ज्यामुळे शरीर अधिक कॅलरीज बर्न करते.
2. चरबी घटवणे :
ग्रीन टी शरीरातील चरबी घटवण्याच्या प्रक्रियेला गती देते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
3. भूक नियंत्रित करणे:
ग्रीन टीमुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्ही कमी खाता आणि वजन कमी करण्यास मदत होते.
4. शरीराला डिटॉक्सिफाय करते:
ग्रीन टी शरीरालाशरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्हाला निरोगी वाटते.
ग्रीन टी किती दिवस प्यावी?
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिण्यासाठी विशिष्ट कालावधी नाही. ते तुमच्या शरीराच्या गरजा आणि वजन कमी करण्याच्या तुमच्या ध्येयांवर अवलंबून असते.
वजन घटवायचे असेल तर दररोज 2-3 कप ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी रिकाम्या पोटी, जेवणानंतर किंवा संध्याकाळी पिऊ शकता.
अति ग्रीन टी सेवनाचे काही दुष्परिणाम
- ग्रीन टीमध्ये कॅफिन असते, म्हणून झोपण्यापूर्वी ते पिऊ नये.
- ग्रीन टी जास्त प्रमाणात घेऊ नका, कारण त्याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो.
- जर आपल्याला काही आरोग्य समस्या असतील तर ग्रीन टी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- ग्रीन टीसोबत निरोगी आहार आणि नियमित व्यायामाचे पालन करा.
- ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करू शकते परंतु पूर्णपणे ग्रीन टी वर अवलंबून राहणे हे काही हिताचे नाही. याच सोबत निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे.












Click it and Unblock the Notifications