Vitamin B-12 : व्हिटॅमिन बी 12 कमी का होतं? मुळापासून कमतरता भरुन काढण्यासाठी उपाय काय? घ्या जाणून

Vitamin B12 : अनेक महिला आणि लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता अनेकदा दिसून येते. जेव्हा आपण डाॅक्टरांकडे जातो तेव्हा हे समजते आणि ते काही इंजेक्शन्स किंवा औषधी देतात. आपणाला डाॅक्टरडे या गोष्टीसाठी जाण्याची वेळ येऊ नये यासाठी खास टीप्स आम्ही आपल्याला देत आहोत.

जीवनसत्व बी 12 ची कमतरता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या B12 सप्लिमेंट्स घ्या किंवा B12 भरपूर असलेले पदार्थ (जसे की अंडी, दूध, मासे आणि चिकन) घ्या.

Vitamin B12

जर तुमच्यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल, तर काही पदार्थ टाळणे महत्वाचे आहे, कारण ते तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत या गोष्टींचे सेवन करणे टाळा

जास्त फायबर असलेले अन्न

संपूर्ण धान्य आणि कोंडा यांसारखे उच्च फायबर असलेले पदार्थ शरीरात व्हिटॅमिन बी12 चे शोषण रोखू शकतात.

प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ

चिप्स, इन्स्टंट नूडल्स आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये पोषणाचा अभाव आहे, ज्यामुळे B12 ची कमतरता आणखी वाढू शकते.

अती प्रमाणात मद्यपान

अती प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची पातळी कमी होते आणि त्याचे शोषण प्रभावित होते.

कृत्रिम, रंगमिश्रीत खाद्यपदार्थ

अशा पद्धतीने बनवलेल्या गोड आणि इतर पदार्थात रसायने असतात ज्यांचा पचनसंस्थेवर आणि जीवनसत्वाच्या शोषणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

चहा- कॅफीनचे अतिसेवन

चहा-कॉफीचे अतिसेवन केल्याने व्हिटॅमिन बी 12 चे शोषण कमी होते, कारण त्यामुळे पोटात आम्लता वाढू शकते .

सोडा आणि कार्बोनेटेड पेये

शरीरात पोषक तत्वांची कमतरता वाढवतात आणि व्हिटॅमिन बी 12 ची पातळी कमी करू शकतात.

कच्च्या किंवा कमी शिजलेल्या भाज्या

व्हिटॅमिन बी 12 प्रामुख्याने प्राणी-आधारित अन्नामध्ये आढळते. तुम्ही फक्त कच्च्या भाज्यांवर अवलंबून राहिल्यास, B12 ची कमतरता वाढू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+