Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सकाळी झोपेतून उठल्यानंतर 'हे' संकेत देतात कर्करोगाचा इशारा; वेळीच व्हा सावध,कशी घ्याल काळजी!

Early morning signs of cancer : सकाळची सुरुवात ही आपल्या दिवसाचा आरसा मानला जातो. आपण झोपेतून उठल्यावर कसे अनुभवतो यावरून आपल्या आरोग्याची स्थिती समजू शकते. पण, जर तुम्हाला रोज सकाळी काही असामान्य आणि चिंताजनक लक्षणे जाणवत असतील, तर ती केवळ किरकोळ समस्या नसून एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा, अन् तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. चला तर या संकेताविषयी आपण जाणून घेऊया आणि वेळीच सावध होऊ या.

Health Tips

मुळात मानवी स्वभाव हा असा आहे की, तो कोणताही आजार हा अंगावर काढतो. काय होते, पाहून घेऊ अशी त्याची मानसिकता ठेवतो. पण हा स्वभाव तुमचे नुकसान करणारा ठरू शकतो.

सकाळी उठल्यानंतरची काही लक्षणे जी आपण अनेकदा किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. परंतु, हे संकेत म्हणा की लक्षणे ती प्रत्यक्षात कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराकडे निर्देश करू शकतात.

कर्करोगाचे निदान जितक्या लवकर होते, तितकाच उपचार सोपा आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे, सकाळी उठल्यावर तुम्हाला खालीलपैकी कोणतीही असामान्य लक्षणे जाणवल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अत्यंत थकवा किंवा अशक्तपणा

पुरेशी झोप झाली तरी देखील तुम्हाला सकाळी उठल्यावर सातत्याने थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे, आणि ही स्थिती अनेक दिवसांपासून सुरूच असेल, तर ते शरीरातील कर्करोगाच्या पेशींमुळे असू शकते. कर्करोगाच्या पेशी शरीरातील ऊर्जेच्या वापराच्या पद्धतीवर थेट परिणाम करतात, ज्यामुळे तुम्ही कायम अशक्त असतात.

अचानक वजन कमी होणे

जर तुम्ही कोणताही डाएट प्लॅन फॉलो करत नसाल किंवा जीवनशैलीत कोणताही मोठा बदल नसतानाही तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागले तर हे पोट, फुफ्फुस किंवा यकृताच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकतात, असे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सतत ताप किंवा घाम फुटणे

सकाळी उठल्यावर सौम्य ताप येणे किंवा रात्री झोपेत खूप घाम येणे, विशेषतः जेव्हा हवामान सामान्य असते, तेव्हा हे ल्युकेमियासारख्या (रक्ताचा कर्करोग) कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे अशी लक्षणे जर तुम्हाला वारंवार जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे ही काळाची गरज आहे.

तोंडाला कोरडेपणा, घसा खवखवणे

दररोज सकाळी घसा खवखवणे किंवा नेहमी कोरडेपणा जाणवणे हे केवळ सर्दी आणि खोकल्याचे लक्षण नाही, घसा किंवा तोंडाच्या कर्करोगाचा प्रारंभिक इशारा देखील असू शकतो. या लक्षणाकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

शरीराच्या कोणत्याही भागात गाठ किंवा सूज येणे

तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर तुमच्या मानेवर, काखेत, जांघेत, स्तनावर किंवा पोटावर कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज जाणवली, जी हळूहळू वाढत आहे किंवा वेदनाहीन आहे, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही गाठ कर्करोगाची असू शकते, त्याची त्वरीत तपासणी करून घेण्याची गरज आहे.

काय काळजी घ्यावी, काय करावे?

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील किंवा ती दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ ती सातत्याने दिसून येत असतील तर वेळीच काळजी घ्या.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

स्वतः उपचार करण्याऐवजी किंवा अंदाज लावण्याऐवजी, त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सर्व आरोग्य तपासण्या करून घ्या

डॉक्टर तुमच्या स्थितीची पुष्टी करण्यासाठी रक्त तपासणी, स्कॅनिंग (उदा. सीटी स्कॅन, एमआरआय), बायोप्सी यांसारख्या आवश्यक चाचण्यांची शिफारस करतील.

वेळीच उपचार उपयुक्त

लक्षात ठेवा, वेळेवर निदान आणि योग्य उपचारांनी अनेक प्रकारचे कर्करोग पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि रुग्णाचे आयुष्य वाचू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+