Sunidhi Chauhan Transformation: सुनिधी चौहानने 10 दिवसात 5 किलो वजन कमी केलं, जाणून घ्या कसे
Sunidhi Chauhan Transformation: प्रसिध्द गायक सुनिधी चौहान तिच्या दमदार आवाज आणि स्टेज परफॉर्मन्सशिवाय तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. नुकतेच वयाच्या 41 व्या वर्षी तिने असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे की सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
फिटनेस ट्रेनर विराज सरमळकर यांना दिलेल्या मुलाखतीत सुनिधीने तिचा वजन कमी करण्याचा प्रवास आणि डाएटबद्ल खुलासा केला आहे. 'आंख' या नवीन डान्स नंबरसाठी तिने अवघ्या 10 दिवसांत 5 किलो वजन कमी केलं आहे.

फोटो सौजन्य- sunidhichauhan5 (इंन्स्टाग्राम)
सुनिधी चौहानने तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल सांगितले की, डाएट आणि उपायांऐवजी तिने सातत्यावर फोकस केले आहे. तिच्या नवीन गाण्यात ती सान्या मल्होत्रासोबत बिकिनी लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे. या गाण्यासाठी सुनिधीने अवघ्या 10 दिवसांत 5 किलो वजन कमी केलं आहे. तिच्या फिटनेस ट्रेनर म्हणाला की, सुनिधी 70 किलो वजनासह स्कॉट करते. तसेच कोणत्याही सपोर्टशिवाय ती 90 किलो वजन उचलते. या शिवाय पुल-अप्स देखील मारते. तसेच तिने 5 किलोमीटरची शर्यत 25 मिनिटांत पूर्ण केली आहे.
सुनिधी चौहानचं डाएट सिक्रेट
सुनिधी चौहानच्या म्हणण्यानुसार फिटनेसचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे योग्य आहार आहे. तिचे फिटनेस ट्रेनर विराजने सांगितले की सुनिधी कॅलरी कंट्रोल डायट फॉलो करते. ज्यामध्ये ती दिवसाला 1200 पेक्षा कमी कॅलरी घेते. याबरोबरच सुनिधी अधूनमधून उपवास करते, ज्याचा उद्देश केवळ वजन कमी करणे नाही तर यकृताला विश्रांती देणे देखील आहे. ती दररोज 16 तास उपवास करते. तसेच जेवणाचे योग्य टाईमिंग पाळते.
सुनिधी चौहानचे डाएट रूटीन
सुनिधी चौहान तिच्या दिवसाची सुरुवात अंड्याने करते आणि अधूनमधून आंबट ब्रेडचे स्लाईस घेते. तिला असा विश्वास आहे की अधूनमधून उपवास करताना दिवसाची सुरुवात प्रथम प्रथिने आणि चरबीने केली पाहिजे, कारण हे कार्बोहायड्रेट्सपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. जर तिला भूक लागली तर ती ड्रायफ्रूट खाते, जेणेकरुन काहीवेळ पोट भरल्यासारखं वाटेल. आठवड्यातून दोन-तीन वेळा वेट लिफ्टिंग करताना ती प्रोटीन शेक देखील घेते. तिचे दिवसाचे शेवटचे जेवण संध्याकाळी साडेसातच्या आत घेते.












Click it and Unblock the Notifications