Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मासिक पाळीच्या काळात नवरात्री पूजा कशी करावी? पीरियड्समुळे तुमच्या पूजामध्ये व्यत्यय येतो का? वाचा

Shardiya Navratri 2025 Can worship Goddess During Periods or not : देशात नवरात्रीचा महोत्सवाला मोठ्या धडाक्यात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही देवीच्या साडेतीन शक्तिपीठासह घराघरात आज घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. आजपासून शारदीय नवरात्री २०२५ ला सुरुवात झाली आहे. या वर्षी नवरात्रीचा कालावधी १० दिवसांचा असून, 'विजयादशमी'च्या दिवशी २ ऑक्टोबरला याची सांगता होईल. देवी यावर्षी हत्तीवर (गज) स्वार होऊन पृथ्वीवर आल्या आहेत, जे सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

Shardiya Navratri 2025

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि अनेक भक्त ९ दिवसांचे उपवास ठेवतात. देवीची पूजा पूर्ण शुद्धतेने करायला हवी, पण जर याच काळात मासिक पाळी सुरू झाली, तर पूजा कशी पूर्ण करावी? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. मासिक पाळी आल्यामुळे पूजा खंडित होते, असे मानले जाते, पण ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे यावर नियंत्रण ठेवता येत नाही. अशा वेळी काय करायला हवे?

मासिक पाळीबद्दलची प्राचीन धारणा

प्राचीन मान्यतेनुसार, मासिक पाळीला 'अशुद्धी'ची अवस्था मानले गेले आहे. यामुळे अनेक कुटुंबांमध्ये महिलांना या काळात मंदिर, पूजा स्थान किंवा धार्मिक विधींपासून दूर राहण्यास सांगितले जाते. मात्र, काळानुसार लोकांच्या विचारांमध्ये बदल होत आहे. आता अनेक लोक मासिक पाळीला एक नैसर्गिक आणि पवित्र प्रक्रिया मानतात, मासिक पाळीत पुजा करायची नाही, ही सामाजिक परंपरा आहे, धार्मिक सत्य नाही, असा अनेकांची धारणा आणि विश्वास आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळातही महिला मनाने पूजा करू शकतात, यात काहीच गैर नाही असेही अनेकांचे मत आहे.

मासिक पाळीत महिला काय करू शकतात?

जरनवरात्रीमध्ये मासिक पाळी आली, तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता..

मानसिक ध्यान: तुम्ही मनाने दुर्गा देवीचे ध्यान करू शकता.

दूरून दर्शन: घरातील मंदिरात किंवा पूजास्थानी जाऊन तुम्ही लांबूनच देवीला नमस्कार करू शकता.

मंत्रोच्चार: मनातल्या मनात दुर्गा चालीसा, स्तुती किंवा मंत्रांचा जप करा.

दुर्गा सप्तशती: तुम्ही मोबाईलवर किंवा इतर डिजिटल माध्यमांवर दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचू शकता किंवा ऐकू शकता.

इतरांची मदत: घरातील इतर सदस्यांकडून तुम्ही पाठ ऐकू शकता.

या गोष्टी टाळा

वाद घालणे टाळा - जर घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला पूजास्थळी जाण्यापासून थांबवत असतील, तर त्यांच्याशी वाद घालू नका. पूजेमध्ये राग आणि तणाव निषिद्ध मानला जातो. शांत मनाने देवीची पूजा करा.

काही विधी टाळा - घटस्थापना, हवन, दुर्गा सप्तशतीचा पाठ (पुस्तकातून), किंवा अखंड ज्योतीपासून दूर राहा.

शांत आणि समाधानी मन - जर शारीरिक अस्वस्थता असेल, तर जबरदस्तीने उपवास करू नका. जे काही कराल ते शांत, समाधानी आणि श्रद्धेने करा, तरच तुमची पूजा सफल होईल.

टीप: या लेखाचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मान्यतांवर आधारित आहे. कोणतीही माहिती अंमलात आणण्यापूर्वी, कृपया जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या.

हेही वाचा : Shardiya Navratri 2025 Wishes in Marathi : नवरात्रीसाठी टाॅप 30 मराठी शुभेच्छा संदेश, वाचा अन् पाठवा

हेही वाचा : Rashi Bhavishya : नवरात्रीमध्ये 'या' 4राशींच्या लोकांचे फळफळेल भाग्य, पगार वाढीची दाट शक्यता

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+