Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'साई बाबा' फेम अभिनेते सुधीर दळवी 'या' गंभीर आजाराने त्रस्त; उपचारासाठी कुटुंबाने मागितली आर्थिक मदत

Sai baba fame actor sudhir dalvi critical sepsis infection : सिने जगतातील जेष्ठ अभिनेते सुधीर दळवी, ज्यांनी १९७७ च्या 'शिरडी के साईं बाबा' चित्रपट आणि 'रामायण' मालिकेतून घराघरात पोहोचून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले, त्यांच्यासाठी सध्या अत्यंत कठीण काळ आहे. ८६ वर्षीय दळवी यांना गंभीर सेप्सिस इन्फेक्शनने ग्रासले असून ते सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

आतापर्यंत उपचाराचा खर्च १० लाख रुपयांहून अधिक झाला असून, पुढील उपचारांसाठी अजून १५ लाख रुपयांची तातडीची गरज आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाला उपचारासाठी आर्थिक मदतीचे भावनिक आवाहन करावे लागले आहे.

Sai baba fame actor sudhir dalvi

सुधीर दळवी यांच्या प्रकृतीची ताजी अपडेट

अभिनेते सुधीर दळवी हे गंभीर सेप्सिस इन्फेक्शनने त्रस्त आहेत. सेप्सिस म्हणजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती उपचारासाठी अत्यंत सक्रिय होते, पण त्यामुळे शरीरातील इतर पेशी आणि अवयवांना नुकसान पोहोचू लागते, ज्यामुळे शरीराचा कोणताही भाग खराब होऊ शकतो. त्यांना ८ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या कुटुंबाने उपचारांसाठी चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून ₹१५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत मागितली आहे. ही बातमी मिळताच, रणबीर कपूर यांची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी तातडीने दळवी यांना आर्थिक मदत केली असून, 'लवकर बरे व्हा' अशी इच्छा व्यक्त केली आहे.

काय आहे सेप्सिस आजार?

सेप्सिस हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती रोग बरा करण्याच्या प्रयत्नात इतकी अतिक्रियाशील होते की ती इतर पेशी आणि ऊतींना नुकसान पोहोचवू लागते. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि शरीराच्या इतर भागांना नुकसान होऊ शकते.

सेप्सिप आजाराची लक्षणे काय आहेत?

सेप्सिस हा अत्यंत गंभीर आजार असून, त्याची काही प्राथमिक लक्षणे खालीलप्रमाणे दिसतात.

  • तीव्र आणि जास्त ताप येणे.
  • शरीरातील हृदयाची धडधड, ठोके अचानक वाढणे.
  • सतत अशक्तपणा आणि चक्कर येणे.
  • त्वचा पिवळी पडणे.
  • लघवी न होणे किंवा कमी होणे.

सुधीर दळवी यांची कारकीर्दीवर एक नजर

  • अभिनेते सुधीर दळवी केवळ 'साईं बाबा' या भूमिकेसाठीच नव्हे, तर त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
  • साईं बाबाची भुमिका त्यांनी केली. १९७७ मध्ये आलेल्या 'शिर्डी के साईं बाबा' चित्रपटामुळे ते घराघरात पोहोचले.
  • सुधीर दळवी यांनी 'रामायण' या दूरचित्रवाणी मालिकेतही भूमिका केली आहे. याशिवाय, 'जुनून', 'चांदनी' आणि 'एक्सक्यूज मी' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+