पावसाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर माहिती...
पावसाळा आला की वातावरणात गारवा पसरतो निसर्ग बहरून येत असल्याने हा ऋतू अगदी आनंददायी वाटतो पण पावसाळा सुरू झाला की पावसासोबतच आजार देखील येत असतात. पावसाळ्यात सर्दी ,फ्लू ,ताप, अतिसार हे आजार होतात.
लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत कोणत्याही वयोगटातील कोणालाही हे हंगामी आजार होऊ शकतात. तसेच पावसामध्ये पाणी आणि चिखल साचल्यामुळे त्यापासून डेंगूच्या डासाचे प्रमाण वाढते आणि डेंगू मलेरिया देखील होतात. अनेक प्रकारचे त्वचारोग देखील होण्याची शक्यता असते.

खाज सुटणे जळजळ कोरड्या त्वचेची समस्या उद्भवू लागते त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. आणि आजार टाळण्यासाठी देखील करता येऊ शकतात. त्यामुळे काय उपाययोजना करता येऊ शकतात हे आपण जाणून घेऊया.....
पावसाळ्यातील प्रमुख आजार
- डेंग्यू आणि मलेरिया: हे आजार डासांच्या चावण्यामुळे होतात.
- गॅस्ट्रोएन्टराइटिस (जुलाब आणि उलट्या): दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो.
- टायफॉइड: दूषित पाण्यामुळे होतो.
- हवामान बदलामुळे होणारे आजार: सर्दी, खोकला, ताप, इन्फ्लुएन्झा.
- कावीळ: दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो.
- त्वचा आणि पायांच्या आजार: उदा. फोड, रिंगवर्म, पायांचा संसर्ग इ.
प्रतिकारशक्ती वाढवा:
तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे हे पहिले पाऊल उचलणे आवश्यक आहे. पावसाळ्यात बहुतेक रोग आणि संसर्ग रोग प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे होतात. तसेच वातावरणातील ओलावा जास्त असल्याने तुम्हाला खोकला, सर्दी आणि तापाचा त्रास होऊ शकतो. सुरक्षित राहण्यासाठी, तुम्ही सूपमध्ये लसूण घालणे आणि चहामध्ये आले घालणे यासारखे काही घरगुती उपाय करून पाहू शकता
उपाय
डास प्रतिबंधन
- घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.
- मच्छरदाणी आणि मच्छर मारण्यासाठी स्प्रे वापरा.
- पूर्ण बाहीचे कपडे परिधान करा.
- घरोघरी मच्छर प्रतिबंधक तैल वापरा.
स्वच्छ पाणी आणि अन्न
- फक्त शुद्ध आणि उकळलेले पाणी प्या.
- फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खा.
- 'रस्त्यावरील अन्न आणि पाणी टाळा.
स्वच्छता
- हात नियमितपणे साबणाने धुवा.
- शौचालयांचा स्वच्छ वापर करा.
- पायातील फोड आणि जखमा स्वच्छ ठेवा.
रोग प्रतिबंधक लसीकरण:
- टायफॉइड, हेपाटायटिस इत्यादी रोगांचे लसीकरण करा.
ताप आणि सर्दी-खोकला प्रतिबंध
- पावसात भिजल्यास त्वरीत कोरडे कपडे घाला.
- इम्युनिटी वाढवण्यासाठी पोषक आहार घ्या.
- गरम पाण्याचे सेवन करा आणि गरम पेये प्या.
- इम्युनिटी वाढवण्यासाठी पोषक आहार घ्या.
- गरम पाण्याचे सेवन करा आणि गरम पेये प्या












Click it and Unblock the Notifications