Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Russia mrna enteromix cancer vaccine : रशियाची 100% यशस्वी कॅन्सर लस सामान्यांना कधी मिळणार..? वाचा

Russia mrna enteromix cancer vaccine trial successful : जगात कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर संशोधन सुरु असून हा आजार कसा बरा करता येईल आणि यातून संभाव्य मृत्यू कसे टाळता येईल यावर कसोशीने शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत, त्यातच आता एक मोठी बातमी आली आहे. रशियाने कॅन्सरवर लस विकसित केली असून त्याची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली असा दावा रशियाने केला आहे.

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर लस शोधून काढण्यात रशियाने मोठे यश मिळवले असा दावा आहे. रशियाने 'एमआरएनए' (mRNA) तंत्रज्ञानावर आधारित ही कॅन्सरविरोधी लस विकसित केली असून, प्राथमिक चाचण्यांमध्ये या लसीने ट्यूमरचा विकास थांबवण्यासोबतच कॅन्सरच्या पेशींचा फैलाव रोखण्यात उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत, असे या दाव्यात म्हटले आहे.

Russia mrna enteromix cancer vaccine trial successful

लस कशी काम करेल?

रशियाने विकसित केलेली ही लस कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरणार असल्याचे बोलले जात आहे. ही लस कोरोनाच्या लसीप्रमाणेच काम करेल. शरीरात प्रवेश केल्यावर ती थेट कॅन्सरच्या पेशी ओळखेल आणि त्यांना नष्ट करेल. त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांना केमोथेरपीचा असह्य वेदनादायक उपचार टाळता येईल.

लसीचे काही दुष्परिणाम असतील का?

आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये या लसीचा कोणताही नकारात्मक किंवा गंभीर दुष्परिणाम (side effect) दिसून आलेला नाही, ही सर्वात सकारात्मक बाब आहे असे रशियाचा दावा आहे.

लस करेल ट्यूमरवर थेट हल्ला

रशियाने प्राथमिक चाचणी घेतलेली ही लस कॅन्सरच्या गाठींवर (ट्यूमर) थेट हल्ला करते आणि शरीराला कमकुवत करणाऱ्या पेशींना नष्ट करते. काही प्रकरणांमध्ये ही लस कॅन्सरच्या पेशींना मुळापासून नष्ट करते असे सांगण्यात आले आहे. यासह रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ज्यामुळे शरीर स्वतःहून कॅन्सरशी लढण्यास सक्षम होते.

कधी येईल कॅन्सरवरील ही लस

या लसीचे वैद्यकीय परीक्षण सेंट पीटर्सबर्ग येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावर (SPIEF 2025) नुकतेच पार पडले. आता या चाचणी अहवालांचे मूल्यांकन केले जात आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर ही लस लवकरच आरोग्य मंत्रालयाची अंतिम परवानगी मिळवून वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध होईल. ही लस जगभरातील लाखो कॅन्सर रुग्णांसाठी एक आशेचा किरण ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : Brain Infection धक्कादायक! मेंदू खाणारा अमिबा 'या' भागात आजाराचं थैमान 7 जण दगावले! हा आजार काय वाचा

हेही वाचा : Chandra Grahan चंद्रग्रहणात शारिरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? वाचा काय सांगतं शास्त्र अन् विज्ञान

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+