Brain Infection धक्कादायक! मेंदू खाणारा अमिबा 'या' भागात आजाराचं थैमान 7 जण दगावले! हा आजार काय वाचा
Kerala Brain Infection : साॅर्स, कोरोना विषाणू संसर्ग असो की इतर साथीच्या आजार, आता आनंतर आता आणखी एका रोगाने केरळ राज्यात थैमान घातले आहे. मेंदुशी निगडीत हा आजार असून या आजाराने जवळपास सात जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेन इन्फेक्शनशी संबंधीत या आजाराबाबत लोकमतने वृत्त दिले आहे. या आजाराने सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. यातील एक मृत्यू काल ६ सप्टेंबर रोजी पहाटे झाला आहे.

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील बोथरीचा रहिवासी असलेल्या या रुग्णाचा अमिबिक मेनिंगो एन्सेफलायीसने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण ४५ वर्षांचा आहे. या रुग्णावर जवळपास सात दिवस कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु होते.
मीडिया रिपोर्टनुसार, रतीश असे मृत रुग्णाचे नाव असून त्याला खूप ताप आणि खोकला होता. कुटुंबियांनी त्यांना आधी एका रुग्णालयात दाखल केले मात्र, प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी रतीश यांना कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले.
आतापर्यंत सात जणांचा मृत्यू, ११ जणांवर उपचार
प्राप्त माहितीनुसार, अमिबिक मेनिंगो एन्सेफलायीस या आजाराने आतापर्यंत केरळमध्ये सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये एका रुग्णाची प्रकृती गंभीर सांगण्यात आली आहे. तर उपचार पुर्ण झाल्यानंतर दुसऱ्या एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली आहे.
केरळमध्ये ४२ रुग्ण आढळले?
अमिबिक मेनिंगो एन्सेफलायटीसचे आतापर्यंत केरळात ४२ रुग्ण आढळले आहेत. मागील तीन महिन्यात तीन महिन्याचा मुलगा, नऊ वर्षांच्या मुलीसह चार जणांचा एकट्या कोझीकोडमध्ये मृत्यू झाला. ४२ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण कोझीकोड आणि मलप्पुरम् जिल्ह्यातील आहेत.
मेंदु खाणारा अमिबा आजार काय आहे?
- अमिबिक मेनिंगो एन्सेफलायटीस हा दुर्मिळ आणि धोकादायक आजार आहे.
- अमिबिक मेनिंगो एन्सेफलायटीस हा मेंदु संसर्गाशी संबंधित आजार आहे.
- अमिबिक मेनिंगो एन्सेफलायटीस हा आजार नेग्लेरिया फाऊलेरी नामक अमिबामुळे होतो.
- नेग्लेरिया फाऊलेरी नामक अमिबाला ढोबळपणे मेंदू खाणारा अमिबा म्हणतात.
या आजाराची लागण कशी होते?
- दुषित पाण्यात पोहणे, घाण पाण्यात अंघोळ करणे, यामुळे हा आजार होऊ शकतो.
- या पाण्यात असलेले विषाणू/ अमिबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो, त्यामुळे या आजाराची लागण होते.
- खासकरुन उन्हाळा आणि पावसाळ्यात हा अमिबा म्हणजेच नेग्लेरिया फाउलेरी ऊबदार आणि गोड पाण्यात टिकून राहतो.
हेही वाचा : Health Tips:तुमच्या चेहऱ्यावर जर ही लक्षणे दिसली तर सावधान,बॉडीत वाढले कोलेस्ट्रोल, करू नका दुर्लक्ष












Click it and Unblock the Notifications