Green vs Red Apple : लाल की हिरवे, दोन्हीपैकी कोणते सफरचंद खाण्यासाठी आरोग्यदायी ?
Green apple and red apple difference : रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर राहतात ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल. आपण अनेकदा बाजारात दोन प्रकारचे सफरचंद पाहतो ते म्हणजे लाल आणि हिरवे. हिरव्या आणि लाल सफरचंदांमध्ये कोणते खाणे चांगले आहे, असा प्रश्न अनेक वेळा लोकांना पडतो.
लाल सफरचंद आणि हिरवे सफरचंद दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु त्याच्यामध्ये काही फरक आहेत. जाणून घेऊया हिरव्या आणि लाल सफरचंदांमधील फरक आणि ते खाण्याचे फायदे.

हिरवे सफरचंद आणि लाल सफरचंद यांच्यातील फरक
हिरव्या सफरचंदात व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. कमी कॅलरीज आणि कमी गोडपणामुळे वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. म्हणूनच हिरवे सफरचंद हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय मानला जातो.
दुसरीकडे लाल सफरचंदांमध्ये साखरेचे प्रमाण किंचित जास्त असते. ज्यामुळे ते ऊर्जेचा एक चांगला स्रोत बनतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात, जे हृदय आणि इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
कोणत्या सफरचंदमध्ये फायबर आणि जीवनसत्वाचे प्रमाण जास्त ?
दोन्ही सफरचंदांमध्ये फायबर असते, परंतु हिरव्या सफरचंदात किंचित जास्त फायबर असते. हे पचनासाठी अधिक फायदेशीर आहे. दोन्ही सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, परंतु हिरव्या सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन ए अधिक प्रमाणात असते, जे त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
जास्त अँटिऑक्सिडेंट कोणत्या सफरचंदमध्ये ?
लाल सफरचंदात अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात आणि हृदयविकार टाळतात.
वजन कमी करण्यासाठी कोणते सफरचंद अधिक उपयुक्त ?
हिरव्या सफरचंदात कॅलरीज कमी असतात आणि त्यात साखरेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
मधूमेह असलेल्या रुग्णांनी कोणते सफरचंद खावे?
हिरव्या सफरचंदात साखरेचे प्रमाण कमी असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. या कारणास्तव मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.












Click it and Unblock the Notifications