Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ramadan Health Tips: रमजानमध्ये उपवास करून तुम्ही अशी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

Ramadan Health Tips : रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे. आज रमजानचा तिसरा उपवास आहे. हा महिना मुस्लिम समुदायाच्या लोकांसाठी खास असतो. रमजान महिन्यात 30 दिवस उपवास केले जातात. हे उपवास संध्याकाळी इफ्तारने सोडले जातात. या दिवसभराच्या काळात उपवास करणाऱ्या व्यक्तींनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जेणेकरून रमजानमध्ये त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही. तसेच ते निरोगी राहतील.

उपवास करताना दिवसभर पाणी न पिल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो होतो. म्हणून उपवास करताना हायड्रेटेड राहण्यासाठी या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Ramadan 2025

एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका

इफ्तारच्या वेळी बरेच लोक एकाच वेळी भरपूर पाणी पितात. परंतु यामुळे शरीर पूर्णपणे हायड्रेट होत नाही. एकाच वेळी जास्त पाणी पिल्याने पोटावर दबाव येतो आणि पाणी शरीरात योग्यरित्या शोषले जात नाही.

उपवास करताना टाळायच्या चुका

कॅफिनचे सेवन

चहा, कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पदार्थ टाळा. कॅफिन शरीरातून जास्त पाणी काढून टाकते, ज्यामुळे उपवास करताना हायड्रेटेड राहण्यासाठी चांगले नाही. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.

योग्य पाणी पिण्याची पध्दत

उपवास सुरू करण्यापूर्वी सकाळी (सेहरी) योग्य प्रमाणात पाणी प्या. २-३ ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. इफ्तारच्या वेळी हळूहळू, थोडे थोडे करून पाणी प्या. सुरुवातीला एक ग्लास पाणी पिल्यानंतर, काही फळे खावेत, नंतर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिऊ शकता.

फळाचे सेवन करा

टरबूज, काकडी, संत्री, पपई आणि सफरचंद यांसारखी फळे आणि भाज्या पाण्याचे चांगले पर्याय आहेत. त्यांचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि तुमच्या शरीराला आवश्यक पोषण देखील मिळते. त्यामुळे अशावेळी फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर राहतात.

इफ्तार दरम्यान हलके ताजे पेये घेऊ शकता

इफ्तार दरम्यान हलके ताजे पेय पिल्याने शरीर हायड्रेट राहते. यावेळी ताज्या फळांचा रस, नारळ पाणी किंवा थंड दही (लस्सी) पिणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

कमीत कमी 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा

जर तुम्ही उपवास करताना दिवसभर पाणी पिऊ शकत नसाल तर इफ्तार आणि सुहूर दरम्यान किमान 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन शरीर हायड्रेट राहील.

उपवास करताना शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. महिलांनी दररोज 2.1 लिटर पाणी किंवा नारळ पाणी, सूप किंवा हर्बल टी सारखे द्रवपदार्थ पिण्याचे पिलं पाहिजे. पुरुषांनी 2.6 लिटर पेये पिण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+