पुण्यात GBS आजाराचे थैमान; दोघांचा मृत्यू! रुग्ण संख्या शंभरीपार, उपचारास खर्च किती, जाणून घ्या सर्व
Pune GBS Disease : महाराष्ट्रातील पुणे येथे दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार 'गुइलेन बॅरे सिंड्रोम' (GBS) रुग्णांची संख्या शंभरीपार पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे कालच एका जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. पुण्यात ही रुग्णसंख्या वाढत असून हे चिंतेचे कारण बनले आहे.
तीनच दिवसांपूर्वी 67 नवीन प्रकरणे समोर आली होती. यात 13 रुग्णांना व्हेंटीलेटरवरही ठेवण्यात आले होते. या आजाराची व्याप्ती वाढतचअसल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विविध रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. ही प्रकरणे उघडकीस आल्यानंतर पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभागाला गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)बाबत सतर्क करण्यात आले आहे.

सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातील
- सध्या शंभर रुग्णांमध्ये 14 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. आतापर्यंत 101 रुग्णांची नोंद झाली आहे.
- विशेष म्हणजे ग्रामीण भागात रुग्णांची संख्या अधिक आहे.
- पुणे ग्रामीणमध्ये 62, पुणे महापालिका क्षेत्रात 19 रुग्ण, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 14 रुग्ण तर सहा रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.
- यासह एकुण रुग्णात 68 पुरुष तर 33 महिलांचा समावेश आहे. यातील 14 ते 15 रुग्ण कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर आहेत.
काय आहे हा आजार?
GBS मध्ये, शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे, सुन्न होणे आणि कधीकधी अर्धांगवायू यांसारखी लक्षणे दिसतात. चला जाणून घेऊया हा आजार किती धोकादायक आहे?
गुइलेन बॅरे सिंड्रोम गुइलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वयंप्रतिकार विकार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून परिधीय नसावर हल्ला करते. या हल्ल्यामुळे सूज येते आणि मज्जातंतूंना नुकसान होते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, मुंग्या येणे, सुन्न होणे आणि कधीकधी गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो.
या आजाराचे नेमके कारण काय?
- या आजाराचे नेमके कारण अद्याप ज्ञात नाही, परंतु सामान्यतः हा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गासारख्या संसर्गानंतर विकसित होतो.
- फ्लू, डेंग्यू किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शननंतर अनेक प्रकरणांमध्ये GBS आढळून आले आहे. यानंतर रुग्णांनी लगेच डाॅक्टरांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे. कारण योग्य उपचाराने रुग्णाची स्थिती सुधारते.
- गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) ची लक्षणे
- गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) च्या प्रमुख लक्षणांमध्ये स्नायूंमध्ये अचानक कमजोरी
- विशेषत: पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न होणे यांचा समावेश होतो.
- रुग्णाला संतुलन राखण्यात आणि चालण्यात अडचण येऊ शकते.
- गंभीर प्रकरणांमध्ये, श्वास घेण्यात अडचण, जलद हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात बदल देखील दिसून येतात.
- ही लक्षणे वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. वेळेवर उपचार करून लक्षणे नियंत्रित करता येतात.
- Guillain Barrie सिंड्रोम (GBS) वर त्वरित आणि काळजीपूर्वक उपचार आणि व्यवस्थापित केले पाहिजे.
गुइलेन बॅरी सिंड्रोमचा उपचार
1. इम्युनोग्लोबुलिन थेरपी (IVIG) : ही थेरपी रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यास मदत करते.
2. प्लाझ्मा फेरेसिस : यामध्ये रक्तातील हानिकारक अँटीबॉडी काढून मज्जासंस्थेला होणारे नुकसान टाळले जाते.
3. स्वच्छतेकडे लक्ष द्या : संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
4. खबरदारी : तुम्हाला स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे किंवा इतर लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
5. संसर्गानंतर खबरदारी : कोणत्याही संसर्गानंतर शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
वेळेवर उपचार करून स्थिती सुधारणे शक्य आहे.
उपचारासाठी किती खर्च लागतो?
राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या शंभरावर गेली असून सुमारे 19 रुग्ण 9 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 50-80 वयोगटातील 23 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पुणे क्लस्टरमधील पहिला जीबीएस रुग्ण ९ जानेवारी २०२५ रोजी आढळला. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून घेतलेल्या काही जैविक नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळून आले. पुण्यात, विशेषतः ज्या भागात रुग्णांची नोंद होत आहे, तेथे अधिकारी पाण्याचे नमुने घेत आहेत.
पुण्यात आरोग्य विभागाकडून काय झाली तयारी?
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी पीटीआयला सांगितले की, लहान मुले आणि तरुण वयोगटातील दोघांनाही जीबीएसची लागण होऊ शकते. जीबीएसमुळे महामारी किंवा जागतिक महामारी होणार नाही. बहुतेक लोक या आजारातून बरे झाले आहेत. डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले की, बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यतः जीबीएस आजाराची लागण होते. सीडीसीच्या मते, कॅम्पिलोबॅक्टर संसर्ग हे युनायटेड स्टेट्समध्ये जीबीएसचे सर्वात सामान्य कारण आहे. पुण्यातही अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करत आहेत.
एका इंजेक्शनसाठी 20 हजार रुपये खर्च
जीबीएसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याचे माहिती मिळत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या ६८ वर्षीय महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, तिच्या उपचारात एकूण १३ इंजेक्शन्स वापरली गेली.
जीबीएस आजाराची नेमकं लक्षणे कशी ओळखणार
जीबीएसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा आणि हाता-पायाला मुंग्या येणे यांचा समावेश आहे. जीबीएसच्या रुग्णांना दोन्ही पायांमध्ये ही लक्षणे जाणवतात. यानंतर हळूहळू संपूर्ण शरिरात वेदना जाणवतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जीबीएसमुळे अचानक सुन्नपणा येतो आणि स्नायू कमकुवत होतात. यासोबतच, या आजारात हात आणि पायांमध्ये तीव्र कमजोरी अशी लक्षणे देखील आहेत.
पुण्यात आरोग्य विभागाकडून काय केली तयारी?
'गीयन बारे सिंड्रोम' अर्थात जीबीएस या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी ट्वीट केले आहे. आपण पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करुन काही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे खासदार मुरलीधर यांनी केले आहे.
मुरलीधर मोहळ यांचे ट्वीट:-
1. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार
2. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना 'शहरी गरीब' योजनेचा लाभ देऊन पुणे महापालिकेच्या वतीने २ लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणारआहे.
3.कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी 'इम्युनोग्लोब्यूलिन' हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे.












Click it and Unblock the Notifications