Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PM मोदींच्या ऊर्जेचे 'हे' आहे गुपित! 75 व्या वर्षीही फिट राहण्यासाठी घेतात 'या' सुपरफूडचा आधार

PM Modi favourite superfood ashwagandha benefits : वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा आणि सक्रियता तरुणांना लाजवेल अशी आहे. दिवसाचे १८-१८ तास काम करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. यामागे केवळ योगासनासोबतच आयुर्वेदातील एका 'मॅजिकल हर्ब'चा मोठा वाटा आहे. जागतिक स्तरावर ज्याचा डंका मोदींनी स्वतः वाजवला, ते सुपरफूड म्हणजे 'अश्वगंधा'. मानसिक शांततेपासून ते शारीरिक ताकदीपर्यंत, अश्वगंधा नक्की शरीरावर काय जादू करते आणि तुम्ही याचा वापर कसा करू शकता, हे जाणून घेऊया.

PM Modi favourite superfood

अश्वगंधाचे ४ थक्क करणारे फायदे

१. तणाव आणि चिंता होईल छू-मंतर

अश्वगंधा हे एक प्रभावी 'एडेप्टोजेन' आहे. हे शरीरातील स्ट्रेस हार्मोन म्हणजेच 'कोर्टिसोल'ची पातळी कमी करते. मोदींसारख्या अतिव्यस्त व्यक्तीला कठीण प्रसंगातही शांत राहण्यासाठी आणि मानसिक स्पष्टता राखण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो.

२. मेंदूची कार्यक्षमता आणि एकाग्रता

संशोधनानुसार, अश्वगंधाचे नियमित सेवन तुमची स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवते. तसेच, हे मेंदूच्या पेशींना 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस'पासून वाचवते, ज्यामुळे उतारवयात विस्मरणाची समस्या (अल्झायमर) उद्भवण्याचा धोका कमी होतो.

३. शरीराला मिळते 'घोड्यासारखी' ताकद

'अश्वगंधा' या नावाचा अर्थच 'घोड्यासारखी शक्ती देणारा' असा आहे. हे स्नायूंच्या विकासासाठी आणि शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रामबाण आहे. याशिवाय, हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.

४. निद्रानाशावर प्रभावी उपाय

या औषधी वनस्पतीचे लॅटिन नाव 'विथानिया सोम्नीफेरा' आहे, ज्याचा अर्थ 'झोप आणणारा' असा होतो. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा तणावामुळे झोप उडाली असेल, तर अश्वगंधा तुमचे नर्वस सिस्टम रिलॅक्स करून गाढ आणि शांत झोप मिळवून देते.

कसा कराल अश्वगंधाचा वापर?

दूध आणि मध: रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध आणि मधात अर्धा चमचा अश्वगंधा पावडर मिसळून घ्या.

हेल्दी स्मूदी: केळी, खजूर आणि दुधामध्ये अश्वगंधा घालून चविष्ट स्मूदी बनवू शकता.

अश्वगंधा चहा: सकाळी किंवा संध्याकाळी आल्याच्या चहामध्ये अश्वगंधा घालून त्याचे सेवन करा.

पौष्टिक लाडू: ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी अश्वगंधाचे लाडू हा एक सोपा आणि प्रवासात सहज नेता येणारा पर्याय आहे.

(महत्वाची सूचना: ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही औषधी वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

हेही वाचा : उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दररोज सकाळी खा 'या' 5 गोष्टी; 'हार्ट अटॅक'चा धोका होईल कमी!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+