वर्क स्ट्रेसमुळे ओला इंजिनिअरची आत्महत्या! कामाचा ताण कसा हलका कसा करायचा? एक्स्पर्टच्या टीप्स वाचा
Ola engineer commits suicide due to work pressure : ओलाच्या एआय कंपनी 'कृत्रिम' मध्ये इंजिनिअर असलेल्या 25 वर्षीय निखिल सोमवंशीने आपले जीवन संपवले. त्याचा मृतदेह आगरा तलावाजवळ आढळला. 8 मे 2025 रोजीच्या या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. निखिल ऑगस्ट 2024 मध्ये या कंपनीत रुजू झाला होता. बोल्ड स्कायच्या वृत्तानुसार, प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की निखिलवर कामाचा खूप ताण होता, ज्यामुळे तो प्रचंड मानसिक ताणतणावात होता. यानंतर लोकांनी ओला टेकच्या कार्यसंस्कृतीवर जोरदार टीका केली आणि कामाच्या अत्यधिक दबावाबद्दल ते व्यक्त झाले.
अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. निखिलच्या प्रकरणाप्रमाणेच, इतर अनेक संस्थांमध्येही कामाच्या दबावाशी संबंधित गंभीर प्रकरणे उघडकीस आली आहेत.अर्न्स्ट अँड यंगमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय अण्णा सेबास्टियनचाही याच कारणामुळे मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि कुटुंबाने सांगितले की जास्त वेळ काम करण्याच्या दबावामुळे त्यांचे आरोग्य बिघडले होते.

अशा एक ना अनेक घटना आहे जिथे कामाच्या ताण-तणावामुळे व्यथित होऊन तरुणांनी अथवा ठिकठिकाणी संस्थात काम करणाऱ्या लोकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे समुपदेशक सांगतात की, ताणाचे व्यवस्थापन करा, ताण येणार नाही किंवा तो आलाच तर हलका कसा होईल याकडे लक्ष द्या त्यासाठी त्यांनी टीप्स सांगितल्या असून त्या आपण जाणून घेऊया.
कामाचा ताण कसा व्यवस्थापित करायचा?
या गंभीर विषयावर तज्ज्ञांनी सांगितले की ऑफिसमध्ये कामाचा ताण व्यवस्थापित करणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.
तुमच्या समस्या शेअर करा
जर तुम्हाला ऑफिसच्या कामामुळे ताण येत असेल तर ते लपवू नका. तुमच्या वरिष्ठांशी मोकळेपणाने बोला. तुमच्या कामावर का परिणाम होत आहे आणि तुम्हाला कोणत्या समस्या येत आहेत ते त्यांना सांगा. यामुळे वरिष्ठांना तुम्हाला मदत करण्याची संधी मिळेल आणि ते तुमच्यासाठी एक चांगले वातावरण तयार करू शकतील.
स्वःतसाठी वेळ काढा
दिवसभराचा ताण टाळण्यासाठी दररोज एक तास स्वतःसाठी काढा. हा वेळ फोन, टीव्ही, लॅपटॉपपासून दूर घालवा. शांत बसा आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी आणि त्या कशा सोडवता येतील याचा विचार करा. हा एक मानसिक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा ताण नियंत्रित करू शकता.
गाणी, संगीत ऐका
संगीत ऐकल्याने ताण कमी होतो. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की चांगले संगीत ऐकल्याने मनाला आराम मिळतो आणि ताण कमी होतो. म्हणून तुमच्या आवडीचे संगीत ऐका आणि स्वतःला तणावमुक्त ठेवा.
डिजिटल साधने काही काळ दूर ठेवा
आजच्या डिजिटल युगात, फोन आणि लॅपटॉप देखील तणावाचे प्रमुख कारण असू शकतात. संगणकावर जास्त वेळ काम करणे आणि फोनवर व्यस्त राहणे यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. तुमच्या मोकळ्या वेळेत सोशल मीडिया वापरण्याऐवजी किंवा व्हिडिओ पाहण्याऐवजी, कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. यामुळे केवळ ताण कमी होईल आणि तुमचे नातेही मजबूत होईल.
ताण कसा येतो? परिणाम काय होतात..
जर कामाचा ताण जास्त असेल तर त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सतत जास्त वेळ काम केल्याने नैराश्य, चिंता, झोपेचा अभाव इत्यादी समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, कर्मचारी आणि कंपनी दोघांनीही कामाचे वातावरण सुधारण्यासाठी आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी एकत्र काम करणे महत्वाचे आहे.












Click it and Unblock the Notifications