Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Never Reheat These 7 Foods: सावधान! 'हे' 7 पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करून खाऊ नका; हाणीकारक ठरु शकते

Never Reheat These 7 Foods : रात्रीचे अन्न सकाळी शिळे होते आणि अनेक लोक तेच गरम करुन खातात. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी केलेले अन्न दुपारी पुन्हा गरम करुन खाल्ले जाते, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या आहेत, अनेक जण शिळे आवडीने खातात, मुद्दामहून रात्रीचा भात सकाळी फोडणी देऊन खातात, चविष्ट लागते म्हणून अत्यंत समाधानाने खातात पण शिळे असो की, गरम करुन खाणे या सवयी आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

यातील काही असेही पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करणे योग्य नाही, ज्यांना पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात आणि ते शरीरासाठी विषासारखे काम करू लागतात. जर तुम्हालाही अशी सवय असेल, तर ती ताबडतोब बदला.आता कोणते ते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.

Never Reheat These 7 Foods

७ पदार्थ जे चुकूनही पुन्हा गरम करून खाऊ नये

भात

अनेकदा लोक भात किंवा फ्राइड राईस पुन्हा गरम करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, भात पुन्हा गरम केल्यावर त्यात 'बॅसिलस सेरेस' (Bacillus cereus) नावाचे बॅक्टेरिया सक्रिय होतात. यामुळे फूड पॉयजनिंग आणि उलट्या-जुलाबाची समस्या होऊ शकते.

बटाटा

बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च असतो. बटाटा पुन्हा गरम केल्यास हा स्टार्च तुटून 'टॉक्सिक कंपाऊंड्स' (विषारी पदार्थ) तयार होतात. यामुळे पचनाच्या समस्या आणि पोट खराब होण्याचा धोका वाढतो.

पालक

पालक हे लोह आणि नायट्रेट्सचा चांगला स्रोत आहे. पण, पुन्हा गरम केल्यावर त्यातील नायट्रेट्सचे रूपांतर 'नायट्राइट'मध्ये होते, जे शरीरासाठी विषारी ठरू शकते. पालकाची भाजी किंवा भजी पुन्हा गरम करून खाणे टाळा.

मशरूम

मशरूममध्ये प्रथिने (Protein) जास्त असतात. मशरूम पुन्हा गरम केल्यावर या प्रथिनांची रचना बदलते, ज्यामुळे पोटदुखी आणि गॅस्ट्रिक समस्या होऊ शकतात.

अंडी

अंडी पुन्हा गरम केल्यास त्यातील प्रथिने 'टॉक्सिक' स्वरूपात बदलतात. यामुळे पचनाशी संबंधित समस्या आणि पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते.

चिकन/मांस

नॉन-व्हेज पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यातील प्रथिने आणि फायबर तुटतात आणि 'कार्सिनोजेनिक' (कर्करोगास कारणीभूत) पदार्थ तयार होऊ शकतात. यामुळे फूड पॉयजनिंग आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

बीट

बीटमध्येही नायट्रेट्स असतात. पुन्हा गरम केल्यावर या नायट्रेट्सचे रूपांतर नायट्राइटमध्ये होते, ज्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होऊ शकते.

Disclaimer : या लेखातील माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+