Navratri 2024 : नवरात्रीच्या उपवासात आपण चहा किंवा ग्रीन टी पिऊ शकतो का?
Navratri 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भाविक भक्तीभावाने 9 दिवस देवीचे उपवास करत असतात. मात्र उपवास करणा-या व्यक्तींनी खाण्या-पिण्याच्या सवयींशी संबंधित नियमाचे काटेकोरपणे पालन करावं लागतं.
उपवासाच्यावेळी आपण अनेकवेळा आपल्या सोयीयनुसार अंदाज लावून त्या पदार्थ किंवा पेयचे सेवन करत असतो. मात्र मग नंतर घरातील वरिष्ठ व्यक्तींनी सांगितल्यानंतर आपल्या लक्षातं येतं की, उपवासात असे पदार्थ किंवा पेयचं सेवन करता येत नाही . तर चला मग जाणून घेऊया की या नवरात्रीच्या उपवासात चहा आणि कॉफीचे सेवन करता येईल का?

उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिऊ नका
नवरात्रीच्या उपवासला तुम्ही चहा आणि कॉपीचे सेवन जरुर करु शकता. पण त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही जर उपवासात चहा किंवा कॉफी घेत असाल तर ते फक्त उपाशी पोटी पिऊ नका. उपाशी पोटी या पेयांचे सेवन केल्याने गॅस्ट्रिक समस्या, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. जेणेकरुन तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. मात्र तुम्ही काही फळे किंवा हलके अन्न खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी सेवन करु शकता. चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते, ज्यामुळे उपवास करताना अशक्तपणा किंवा डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. चहा आणि कॉफीच्या अतिसेवनाचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो.
आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही उपवासाच्या वेळी चहा, कॉफी पिऊ शकता, परंतु ते जास्त प्रमाणात पिणे टाळावे. उपवासाच्या वेळी उपाशी पोटी कॉफी घेणे टाळावे. त्याआधी काही फळे किंवा उपवासासाठी बनवलेले पदार्थ खाल्ल्यानंतरच कॉफीचे सेवन करायला हवे. तुम्ही जर उपाशी पोटी चहा, कॉपीचे सेवन केल्यास ॲसिडिटी किंवा गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात.
ग्रीन टी पिऊ शकतो की नाही?
आहारतज्ञांच्या मते उपवासात लिक्किवड डायटवर जास्त फोकस केले पाहिजे. दर दोन तासांनी लिंबू पाणी किंवा ग्रीन टी चे सेवन केल्याने आम्लपित्तापासून बचाव होतो आणि एनर्जी लेव्हलही कायम टिकून राहते. ग्रीन टी प्यायला खूप हलकं आहे आणि त्यात कोणतेही ठोस घटक नसतात, त्यामुळे नवरात्रीच्या उपवासात ग्रीन टी चे सेवन करु शकता. यासोबतच त्यातील अँटीऑक्सिडंट्स पचनास मदत करतात आणि शरीर हायड्रेटही राहते.












Click it and Unblock the Notifications