Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Dengue : डेंग्यूच्या काळात काय खावे अन् काय खाऊ नये?, 'या' गोष्टींमुळे तुम्ही व्हाल त्वरीत तंदुस्त!

National Dengue Day 2025, Dengue Diet : डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. या डासाच्या चावल्यानंतर काही तासांत डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात. जर वेळेवर उपचार केले नाहीत तर ते जीवघेणे देखील ठरू शकते.

विशेष बाब म्हणजे, डेंग्यू तापावर अद्याप कोणताही ज्ञात उपचार आलेले नाही. यामध्ये, लक्षणे कमी करणाऱ्या पद्धती वापरल्या जातात. 16 मे हा दिवस (National Dengue Day 2025) डेंग्यू डे म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने साजरा केला जातो. त्याचे कारण, म्हणजे, या आजाराची जनजागृती व त्यापासून कसा बचाव केला पाहिजे, याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येते.

डेंग्यूपासून बरे होण्यासाठी औषधांसोबतच योग्य आहार देखील महत्त्वाची मानला जातो. योग्य आहार शरीराला हायड्रेटेड ठेवतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि प्लेटलेटची संख्या वाढविण्यास मदत करतो. त्याच वेळी, काही अन्नपदार्थ असे आहेत, जे डेंग्यूची लक्षणे वाढवू शकतात. डेंग्यूच्या वेळी काय खावे आणि काय टाळावे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

National Dengue Day 2025

डेंग्यूच्या काळात काय खावे?

  • डेंग्यूमध्ये डिहायड्रेशनचा धोका असतो. म्हणून, भरपूर पाणी, नारळपाणी, ओआरएस आणि ताज्या फळांचे रस प्या. नारळ पाणी नक्की प्या कारण त्यात पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात, जे शरीराला ऊर्जा देतात.
  • पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यास मदत करतो. दररोज 2-3 चमचे पपईच्या पानांचा रस प्या किंवा ताजी पपई खा.
  • दलिया, खिचडी, उकडलेल्या भाज्या आणि सूप यासारखे हलके अन्न खा. हे पचायला सोपे असतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात.
  • पालक आणि मेथीसारख्या भाज्यांमध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते, जे अशक्तपणा रोखण्यास मदत करतात, तुम्ही त्यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.
  • संत्री, किवी आणि आवळा यांसारखी फळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला विषाणूंशी लढण्याची ताकद देतात, त्यांचा आहारात समावेश करा.

डेंग्यूच्या काळात काय खाऊ नये?

  • तळलेले, मसालेदार आणि जंक फूड पचनक्रिया बिघडू शकतात आणि यकृतावर दबाव आणू शकतात, म्हणून ते पदार्थ डेंग्यूच्या काळात खाणे टाळावेत.
  • कॉफी, चहा आणि अल्कोहोलमुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. हे प्लेटलेट काउंटवर देखील परिणाम करू शकतात.
  • गोड पदार्थ, सोडा आणि पॅकेज्ड ज्यूस टाळा, कारण ते तुमची प्रतिकारशक्ती आणखी कमकुवत करू शकतात.
  • तसेच, लाल मांस आणि जड प्रथिनेयुक्त अन्न पचण्यास कठीण असते, म्हणून डेंग्यू दरम्यान ते खाऊ नये.
  • लोणचे आणि चिप्स यांसारखे जास्त मीठ असलेले अन्नपदार्थ शरीरातील पाण्याचे प्रमाण असंतुलित करू शकतात, म्हणून ते टाळावेत.

(अस्वीकरण- सदर लेख हा इंटरनेटवरील काही माहिती स्त्रोंतांच्या आधारे घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात डेंग्यूसारखा आजार झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, वरील माहिती वनइंडिया मराठी कोणताही दावा करत नाही.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+