Mouth Ulcers तोंडातले आलेय! हे प्रभावी 10 घरगुती उपचार; जाणून घ्या अल्सरसंदर्भात काय घ्यावी खबरदारी
Mouth Ulcers Home Remedies : अल्सर येणे म्हणजे आपल्या सामान्य भाषेत तोंडातले येणे म्हणतात, प्रचंड वेदना, अन्न चावण्यास त्रास, तिखट खाल्ले तर अजूनच त्रास. किमान चार ते पाच दिवस हा त्रास अनेकांना जाणवतो. त्यातच वारंवार अल्सर येत असेल तर आणखीनच डोकेदुखी असते. या त्रासातून मु्क्ती कशी मिळवायला हवी हेही अनेकांना माहित नसते, तर काहीजण अर्धवट माहितीद्वारे स्वतः उपचार करतात.
तोंडातले येणे ही समस्या फारशी गंभीर नसली तरीही त्यामागे अनेक कारणे असतात, यामध्ये पोटातील उष्णता, पचन समस्या, ताण, हार्मोनल बदल किंवा व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. त्यामुळे या गोष्टींबद्दल आपण जागरुक राहायला हवे आणि वरील समस्या उद्भवू नये यासाठी आपण प्रयत्न करणे कधीही चांगले असते. आज आपण अल्सर म्हणजेच तोंडातले आल्यानंतर त्यावर घरगुती दहा उपाय जाणून घेणार आहोत.

तोंडाच्या अल्सरवर प्रभावी घरगुती उपाय
तुरटी आणि पाणी: कोमट पाण्यात चिमूटभर तुरटी मिसळून दिवसातून २-३ वेळा गुळण्या करा. तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.
नारळाचे तेल: अल्सरवर थेट नारळाचे तेल लावल्याने सूज आणि जळजळ कमी होते. यात दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो.
बर्फ चोखणे: फोडाच्या जागी बर्फ चोखल्याने किंवा लावल्याने जळजळ आणि वेदना कमी होतात.
तुळशीची पाने: दिवसातून २-३ वेळा ५-६ तुळशीची पाने चावा. तुळशीमध्ये अँटीसेप्टिक आणि थंडगार गुणधर्म असतात.
मध: अल्सरवर थेट मध लावल्याने ओलावा टिकून राहतो आणि वेदना व सूज कमी होते.
लसणाचा तुकडा: लसणाचा एक छोटा तुकडा काही सेकंदांसाठी अल्सरवर ठेवल्याने संसर्ग थांबतो.
कोरफडीचे जेल: दिवसातून २-३ वेळा अल्सरवर कोरफडीचे जेल लावा. यामुळे वेदना आणि जळजळ नैसर्गिकरित्या कमी होते.
ताक: ताकात चिमूटभर हळद मिसळून दिवसातून दोनदा प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होते आणि आराम मिळतो.
ज्येष्ठमध पावडर: ज्येष्ठमध पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि अल्सरवर लावा. त्यात असलेले ग्लायसिरायझिन संसर्ग कमी करते.
व्हिटॅमिन सी: लिंबू, आवळा, संत्रा यांसारखे व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ खा. यामुळे व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे अल्सर बरे होण्यास मदत होते.
काही महत्त्वाच्या टिप्स:
- जास्त मसालेदार, आंबट किंवा गरम पदार्थ खाणे टाळा.
- भरपूर पाणी प्या.
- पोट स्वच्छ ठेवा, कारण बद्धकोष्ठता हे अल्सरचे कारण असू शकते.
- जर अल्सर १० दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असतील किंवा वारंवार होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.












Click it and Unblock the Notifications