Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सफरचंद अन् नाशपती दिसायला सारखेच, पण गुणधर्म वेगळे, हे फळ खाण्याचे जाणून घ्या फायदे

फळांमध्ये सर्वात शक्तिशाली फळ म्हणजे सफरचंद. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आहारात फक्त सफरचंद समाविष्ट करावे. सफरचंदासोबतच मौसमी फळे आणि भाज्या खाणे आवश्यक असते आणि तसा सल्ला डॉक्टरही देतात. असेच एक फळ म्हणजे 'नाशपती' आहे. ज्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.

पावसाळ्याच्या दिवसात हे फळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. नाशपती हे फळ अगदी सफरचंदांसारखे दिसते. पण या दोन्ही फळांमधील पोषक घटक आणि चवीमध्ये खूप फरक आहे. दोन फळांपैकी कोणते फळ अधिक पौष्टिक आहे या फळाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

most health benefits of eating pears or nashpati in Marathi

व्हिटॅमिन सी

नाशपतीमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण सफरचंदापेक्षा जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी या हंगामी फळांचा आहारात समावेश करावा.

फायबर

सफरचंदात भरपूर फायबर आढळते. यामध्ये पेक्टिन फायबर विशेषतः आढळते, जे पचनसंस्थेवर नियंत्रण ठेवते आणि पोट भरते. नाशपतीला फायबरचे 'पॉवरहाऊस' म्हणतात. नासपतीमध्ये सफरचंदापेक्षा किंचित जास्त फायबर असते. नाशपतीमध्ये व्हिटॅमिन सी आणि के तसेच पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे निरोगी रक्तदाब राखण्यास मदत करते.

जुनाट आजारांपासून संरक्षण

सफरचंद आणि नाशपती या दोन्हीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते, दोन्ही वजन कमी करण्यासाठी चांगले असतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात जी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. दोन्हीमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे कर्करोग, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या जुनाट आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

सफरचंद की नाशपती, कोणते फळ चांगले?

जर आपण दोन्ही फळांबद्दल बोललो तर आपण सांगू शकता की दोन्ही फळे आरोग्याच्या दृष्टीने समान आहेत. दोन्ही फळांमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात. अशा स्थितीत तुम्ही दोन्ही फळे खाऊ शकता. सफरचंद हे फळ बाराही महिने उपलब्ध असते परंतु नासपती हे फळ फक्त पावसाळ्यात दिसून येते, त्यामुळे या हंगामात नाशपती फळ आवश्यक खावे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+