Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Low BP : 86 वर्षीय रतन टाटा यांचा रक्तदाब अचानक कमी झाला, जाणून घ्या कसा नियंत्रित करावा बीपी

Low BP : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा लो बीपी कमी रक्तदाब झाल्याने मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. रक्तदाब हा सर्वांच्या चिंतेचाच विषय आहे आणि चिंतेमुळेच हा आजार बळावतो. रक्तदाब आणि हृदय याचा मोठा संबंध आहे. रक्तदाब बऱ्याचदा जीवघेणा ठरु शकतो. आपण रक्तदाबाबद्दल आणि उपायांबद्दल जाणून घेऊ.

उच्च रक्तदाब हा चिंतेचा विषय जरी असला तरी तो कमी झाला की,आरोग्याची समस्या उद्गभवते. उच्च रक्तदाब (High blood pressure) ही एक गंभीर आजाराची स्थिती आहे. जो आपल्या किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. बीपीची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक असतात. तर काही आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यानेही आजार बळावतो.

Low BP

काय आहेत रक्तदाब व्याधीची कारणे

  • चुकीच्या गोष्टी खाणे
  • कधीही अन्न खाणे आणि कधीही झोपणे
  • कधीही झोपल्यानंतर उठणे
  • रात्रीचे जागरण
  • अनुवांशिकता

रक्तदाबाची लक्षणे

मूर्च्छा येणे, चक्कर येणे, अंधुक दिसणे, याशिवाय लो बीपी असेल तर छातीत त्रास, पोटात त्रास, गरगरणे असेही काही लक्षणे दिसून येतात. तुमची बीपी पातळी नैसर्गिकरित्या कमी असेल तर यापेक्षा चांगले काहीही नाही, परंतु जर आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे पातळी घसरत असेल तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

हेही वाचा : Ratan Tata :रतन टाटांच्या या आहेत 10 मोठ्या गोष्टी! त्यांनी देशासाठी जे केलं ते कुणालाही जमणार नाही?

कमी रक्तदाबामुळे येणाऱ्या समस्या

खराब जीवनशैली

वाढत्या वयाबरोबर आपले शरीर अनेक रोगांचे घर बनू लागते आणि त्यापैकी एक म्हणजे बीपीची समस्या. असं म्हटलं जातं की, एकदा कुणाला असं झालं की त्याला औषधं घेऊन आयुष्य काढावं लागतं. कमी रक्तदाबाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे खराब जीवनशैली.अशा जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढतात आणि व्यक्ती कमी रक्तदाबाचे रुग्ण बनतात.

हेही वाचा : रतन टाटा यांचे कोणत्या आजाराने आजाराने निधन झाले? अंत्यसंस्कार कधी? एका क्लिकवर सर्व माहिती वाचा

शरीरातील पाण्याची कमतरता

जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर यामुळे देखील तुम्हाला लो बीपीचा त्रास होऊ शकतो. व्यस्ततेमुळे किंवा आळसामुळे लोक कमी पाणी पितात आणि ते लो बीपीसारख्या आजाराचे रुग्ण बनतात. औषधाचा वाईट परिणाम, गंभीर दुखापत, ताणतणाव आणि दीर्घकाळ उपासमार यामुळे तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण देखील होऊ शकता.

  • बीपीचा त्रास टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
  • बीपी अचानक कमी होत असेल तर, ताबडतोब मिठाच्या पाण्याचे सेवन करा. याशिवाय जेवणातील मीठाची पातळी सामान्य ठेवा.
  • दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे. यासाठी दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.
  • कामामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला ताण येत असेल तर तो कमी करण्यासाठी दररोज ध्यान किंवा योगासने करा.
  • हा व्यायाम केल्याने तुम्हाला बीपीच्या त्रासात कमी झाल्याचा फरक जाणवेल.
  • कमी रक्तदाबाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि औषधोपचार करून घ्या.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+