Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Karva Chauth 2024 : करवा चौथला बेसनाच्या लाडूची तऱ्हाच न्यारी; पण बनवायचे कसे? तर हे असे...

Karva Chauth 2024 : करवा चौथ म्हटलं की, गोडधोड आलंच. घरात गोड पदार्थ काय करायचा, तर सगळ्यात पहिलं नाव येतं ते बेसनाच्या लाडूचं. लाडू, चिवडा, चकली यांत बेसनाचे लाडूची तऱ्हाच निराळी. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांच्या सगळ्यांच्याच आवडीचा असतो.

करवा चौथला अनेकांच्या घरी बेसनाचे लाडू हे हमखास करण्यात येतात. यामध्ये काही जणींनी बेसनाचे लाडू करण्याची हौस असते. मात्र, लाडू करण्याची योग्य पद्धत माहित नसल्यामुळे अनेकदा हा लाडू करण्याचा बेत फसतो. त्यामुळेच बेसनाचे लाडू नेमके कसे करावेत याची कृती जाणून घेऊया.

Karva Chauth 2024

बेसन लाडूसाठी काय लागतं साहित्य

  • 1 वाटी बेसन
  • 2 वाटी पीठी साखर
  • 1 वाटी साजूक तूप
  • 1 चमचा वेलचीपूड
  • ड्रायफ्रूट सजावटीसाठी आवडीप्रमाणे

बेसनाच्या लाडूची कृती

स्टेप 1
सगळ्यात आधी काढई किवां पॅनमध्ये चार मोठे चमचे साजूक तूप टाकून घ्या. साजूक तूप नसेल, तर डालडा तूपही वापरू शकता. नंतर यामध्ये दीड कप बेसन घाला.

स्टेप 2
त्यानंतर हे मिश्रण गॅस वर ठेवा आणि मंद आचेवर भाजून घ्या भाजत असताना एक - दोन चमचे तूप टाका. तुमच्या प्रमाणानुसार तूप टाका.

स्टेप 3
हे मिश्रण भाजत असताना हे मिश्रण हलवत राहा. जेणेकरून ते काढई किवां पॅनला चिकटणार नाही. हे बेसनाचे मिश्रण लालसर रंग येईपर्यंत भाजा. 10 मिनिट भाजल्यावर लालसर रंग येईल.

स्टेप 4
बेसनाचा रंग लाल झाल्यवर गॅस बंद करा. त्यामध्ये एक चमचा विलायची पूड टाका. त्यानंतर तुमच्या आवडी नुसार काजू- बदामही टाकू शकता. आता हे मिश्रण चांगले मिसळा आणि बेसन थोडे थंड होईपर्यंत बाजूला ठेवा.

स्टेप 5
हे मिश्रण कोमाट झाल्यवर यात दोन कप पिठीसाखर घाला. हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि लाडू वळायला घ्या. लाडू वळताना त्यावर एक मनुका लावा आणि लाडू वळा. आता हे वळलेले लाडू एका प्लेट मध्ये काढा आता हे लाडू खायला तयार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+