हॉस्पिटलमध्ये बिल भरण्याआधी ‘या' गोष्टी तपासा, अन्यथा होऊ शकते फसवणूक
आजच्या घडीला वैद्यकीय सेवा अधिकाधिक महागड्या होत चालल्या आहेत. उपचारांच्या ताणापेक्षा अधिक तणाव अनेक वेळा अंतिम बिलाच्या आकड्यावर असतो. काही हॉस्पिटल्स, रुग्ण किंवा नातेवाईकांना माहित नसलेल्या कर नियमांचा फायदा घेत, चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त रक्कम आकारतात. विशेषतः जीएसटी (GST) संदर्भात लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो.

जीएसटी कधी लागतो आणि कधी नाही?
रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेला जीएसटी लागतोच असं नाही. काही सेवा अशा असतात ज्यावर सरकारने जीएसटीमधून सूट दिलेली आहे. त्या पुढीलप्रमाणे:
- डॉक्टरी सल्ला, तपासण्या, सामान्य उपचार: यावर 0% GST लागू होतो. म्हणजे अजिबात नाही.
- रुग्ण कक्षाचे भाडं (Room Rent): 5% GST आकारला जातो.
- औषधं आणि वैद्यकीय उपकरणं: 5% ते 12% GST लागू होतो.
- पण काही हॉस्पिटल्स या नियमांचं उल्लंघन करून 18% पर्यंत जीएसटी लावतात, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
बिल भरताना 'या' मुद्द्यांवर विशेष लक्ष ठेवा
- फायनल बिल काळजीपूर्वक तपासा: डिस्चार्ज घेण्याआधी संपूर्ण बिल बारकाईने वाचा.
- अवैध जीएसटीवर आक्षेप घ्या: डॉक्टरांचा सल्ला, तपासण्या, बेसिक ट्रीटमेंटवर जीएसटी दिसल्यास तात्काळ विरोध नोंदवा.
- रुग्णालयाचा प्रकार जाणून घ्या: सरकारी, खासगी, कॉर्पोरेट किंवा नॉन-प्रॉफिट संस्थेनुसार बिलाचे नियम बदलू शकतात.
- तपशीलवार बिल मागा: सगळी रक्कम एका रांगेत न पाहता, प्रत्येक सेवा स्वतंत्रपणे किती आकारली याचं ब्रेकअप मागा.
- गुन्हा वाटल्यास तक्रार नोंदवा: ग्राहक मंच किंवा हेल्थ अथॉरिटीकडे तक्रार करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे.
बिलात चुकीचा जीएसटी लावला गेल्यास काय कराल?
- जर हॉस्पिटलने नियमांनुसार न बसणारा कर लावला असेल, तर:
- प्रथम हॉस्पिटल प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार करा.
- दाद मिळाली नाही, तर GST काउंसिल किंवा ग्राहक तक्रार निवारण फोरम यांच्याकडे अधिकृतपणे अर्ज करा.
रुग्णालयात उपचार घेणे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्व पूर्णपणे पारदर्शक बिल मिळवणं देखील आहे. जर तुम्ही सजग असाल आणि योग्य माहिती घेत असाल, तर आर्थिक फसवणूक टाळता येणं शक्य आहे.












Click it and Unblock the Notifications