Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Heart attack : छातीत जळजळ अन् हृदयविकाराच्या झटका यामध्ये फरक काय असतो? जाणून घ्या दोन्हींची लक्षणे

Heart attack vs acidity gas pain : हृदयविकार म्हटले की, समोर मृत्यू दिसतो कारण हृदयविकार अशी व्याधी आहे जी वेळच देत नाही, व्यक्ती क्षणात होत्याचे नव्हते असा होतो..अशी अनेक उदाहरणे आपण पाहीले ऐकली असतील. आजकाल हृदयविकाराच्या झटक्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. कधी, कुठे श्वास थांबेल हेही सांगता येत नाही. लहान मूल असो वा प्रौढ, महिला असो वा पुरुष, सर्वजण त्याचे बळी पडत आहेत.

तुम्ही पाहत असल गाणे गाताना, नाचताना तर काही भाषण देताना आणि हाॅटेलमध्ये जेवण करतानाही अनेकजणांना हृदयविकाराचा झटका येतो आणि जीव जातो. याची लक्षणे तर अनेकांना माहित नाहीत पण बहुतेक लोक हृदयविकाराचा झटका आणि गॅस वेदना किंवा छातीत जळजळ यात काय फरक आहे, याबद्दल देखील गोंधळलेले असतात. अशा परिस्थितीत, कधीकधी थोडीशी निष्काळजीपणा घातक ठरते, म्हणूनच हृदयविकाराचा झटका आणि गॅस वेदना यातील फरक काय असतो जाणून घेऊया.

Heart attack vs acidity

छातीत दुखणे जळजळ आणि हृदयविकाराच्या झटका यामध्ये मोठा फरक आहे. दोन्हीची लक्षणे, कारणे आणि तीव्रता यात मोठा फरक आहे. वेळेत योग्य ओळख आणि उपचार केल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.

हृदयविकाराच्या वेदना कशा असतात?

बऱ्याच वेळा लोकांना गॅस वेदना आणि हृदयविकाराच्या वेदनांमधील फरक समजत नाही आणि ते अडचणीत येतात. तज्ज्ञ सांगतात की, गॅस आणि हृदयविकाराच्या वेदना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या ज्या सर्वांना माहित असणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की हृदयविकाराच्या वेदना जडपणा, घट्टपणा किंवा दाबाने उद्भवतात. ही वेदना डाव्या हातापासून मान आणि जबड्यापर्यंत देखील पसरू शकते. ही हृदयविकाराच्या लक्षणे देखील आहेत.

डॉक्टरांच्या मते, चालण्याने हृदयामुळे होणारा त्रास वाढतो. श्वास लागणे, घाम येणे, घबराट आणि गोंधळ असे वाटते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, वेदना पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त काळ राहिली, विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नसेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उपचार घ्यावेत.

गॅस वेदना किंवा छातीत जळजळ कशी असते?

जळजळ, ढेकर येणे, दंश होणे असे त्रास हे गॅस वेदनेची लक्षणे आहेत, शरीराची स्थिती बदलल्याने वेदना देखील वाढू शकतात. खाल्ल्यानंतर, तळलेले किंवा मसालेदार अन्न खाल्ल्याने गॅस वेदना वाढतात. काही काळानंतर ती कमी देखील होऊ शकते. परंतु वारंवार गॅस होणे कोणाच्याही आरोग्यासाठी चांगले नाही. जर हे वारंवार होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक उद्देशाने आहे. ती कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सल्ल्याचा, तपासणीचा किंवा उपचारांचा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी किंवा प्रश्नासाठी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा किंवा पात्र आणि अनुभवी आरोग्य प्रदात्याचा सल्ला घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+