Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Heart attack : जीवघेणा धोका टाळा! या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच; हार्ट अटॅकपूर्वी शरीर देतं हे संकेत

Heart attack early warning signs 5 symptoms in marathi : आजच्या धकाधकीच्या जीवनात, ताणतणाव आणि अनियमित दिनचर्या याचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होत आहे. हृदयविकाराचा झटका ही अचानक होणारी घटना मानली जाते; पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपले शरीर आपल्याला धोक्याची पूर्वसूचना देते. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफाली जरीवाला किंवा सिद्धार्थ शुक्ला यांच्यासारख्या अनेक कमी वयाच्या व्यक्तींमध्ये अलीकडे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. दुर्दैवाने, अनेक लोक हे सुरुवातीच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे मोठा धोका ओढवतो.

Heart attack early warning signs

हृदयविकाराचे ५ गंभीर पूर्वसंकेत

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खालील ५ लक्षणे शरीरात वारंवार दिसत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे,वेळीच सावध होण्यासाठी आवश्यक असलेले हे ५ महत्त्वाचे संकेत जाणून घेणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे.

१. विनाकारण किंवा सततची थकवा

जर तुम्ही कोणतेही मोठे काम केले नसताना, अगदी सामान्य चालणे किंवा पायऱ्या चढणे यामध्येही तुम्हाला असामान्य थकवा जाणवत असेल, किंवा विश्रांतीनंतरही थकवा दूर होत नसेल, तर हे लक्षण गंभीर असू शकते. सतत डोकेदुखी सोबत असल्यास, आपले हृदय कमकुवत होत असल्याचे हे संकेत आहेत.

२. अचानक चक्कर येणे आणि अंधारी

थकवा किंवा मोठ्या आजाराशिवाय जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल, डोळ्यांसमोर अंधारी येत असेल किंवा तुम्ही बेहोश होत असाल, तर हे हृदयातील रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसल्याचे लक्षण आहे.

३. छातीत हलकी वेदना

हार्ट अटॅक म्हणजे छातीत असह्य वेदना आणि जळजळ असणे, हा समज चुकीचा आहे. अनेकदा हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिनाभर आधीपासून छातीत हलकी वेदना किंवा दाब जाणवतो, जी राहून-राहून येते. याशिवाय, शरीराच्या एका भागात वेदना किंवा सुन्नता जाणवणे हे देखील हृदयविकाराचा संकेत असू शकतो.

४. पाय सुजणे किंवा अचानक वजन वाढणे

जर तुमचे वजन अचानक वाढले असेल किंवा तुमच्या पायांना सूज येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हृदय शरीरातून रक्त व्यवस्थित पंप करत नसल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे.

५. दृष्टीमध्ये अचानक बदल

एका विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित न करता येणे, धूळकट दिसणे म्हणजेच बलर्रर..दिसणे किंवा अचानक डोळ्याचा नंबर बदलणे, तसेच दोन-दोन दिसण्याचा त्रास होणे हे देखील हृदयविकाराचा इशारा असू शकतो.

सावध रहा आणि डॉक्टरांना भेटा!

जर तुम्हाला वर नमूद केलेल्यांपैकी कोणतीही लक्षणे वारंवार दिसत असतील, तर त्वरित सावधान व्हा. हे संकेत सामान्य मानून दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि हृदयाची नियमित तपासणी करून घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+