Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Health Tips: 2025 मध्ये 'या' आजारांनी घातले थैमान; 2026मध्ये कसे राहाल तयार, जाणून घ्या सर्व काही!

Health Tips : सरते वर्ष २०२५ हे आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरले. या वर्षात डेंग्यू, कोविड-१९ आणि गोवर यांसारख्या आजारांनी केवळ कहरच केला नाही, तर मानवी आरोग्याच्या सवयींमधील त्रुटीही समोर आणल्या.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, बहुतांश आजार एका ठराविक 'पॅटर्न'नुसार पसरतात. जर आपण हा पॅटर्न वेळेत समजून घेतला, तर २०२६ हे वर्ष आपण अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवू शकतो. येथे काही प्रमुख आजार आणि त्यांना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा दिला आहे.

Healthy 2026 Ahead Lessons from 2025 Diseases

1. डासांमुळे होणारे आजार: डेंग्यू आणि चिकनगुनिया

२०२५ मध्ये ज्या भागात अस्वच्छता आणि साचलेले पाणी होते, तिथे डेंग्यू व चिकनगुनियाचे प्रमाण सर्वाधिक आढळले.

२०२६ साठी धडा : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपल्या परिसरातील पाणी साचणारी ठिकाणे (उदा. जुने टायर्स, कुलर, कुंड्या) स्वच्छ करा. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आपण डासांच्या उत्पत्तीवर सहज नियंत्रण मिळवू शकतो.

2. कोविड-१९: मास्क आणि तत्परता महत्त्वाची

कोविड-१९ दरवर्षी नवीन रूपाने (व्हेरियंट) समोर येत आहे. २०२५ मध्येही त्याचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांनी साध्या सर्दी-खोकल्याकडे केलेले दुर्लक्ष.

काय करावे? कोणतीही साधी औषधे स्वतःहून घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. फ्लू किंवा खोकला असल्यास मास्क वापरण्याची सवय २०२६ मध्येही कायम ठेवा, जेणेकरून संसर्ग इतरांपर्यंत पोहोचणार नाही.

3. गोवर आणि लसीकरणाचे महत्त्व

२०२५ मध्ये गोवरचे पुनरागमन चिंताजनक होते. ज्या मुलांचे किंवा व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले नाही, त्यांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसला.

लसीकरण अनिवार्य : दीर्घकालीन आजार टाळण्यासाठी सरकारी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपले आणि आपल्या मुलांचे लसीकरण पूर्ण करा. लसीकरण हाच गोवरविरुद्धचा सर्वात मोठा ढाल आहे.

4. त्वचा आणि डोळ्यांचे संसर्ग: वैयक्तिक स्वच्छता

कन्जंक्टिवाइटिस (डोळे येणे), बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) आणि खरुज यांसारख्या समस्या २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसल्या. याचे मुख्य कारण म्हणजे खराब वैयक्तिक स्वच्छता.

सावधगिरी : आपल्या वैयक्तिक वस्तू जसे की मेकअप किट, रेझर, टॉवेल किंवा साबण इतरांशी शेअर करू नका. नियमित हात धुणे आणि स्वच्छ राहणे हे या संसर्गांना दूर ठेवण्यासाठी पुरेसे आहे.

5. स्वतः औषधोपचार टाळा

अनेकजण डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून स्वतःच्या मनाने औषधे घेतात किंवा कोर्स अर्धवट सोडतात. यामुळे मूत्रपिंड (Urinary Infection) आणि श्वसनाचे गंभीर विकार बळावत असल्याचे २०२५ मध्ये दिसून आले.

महत्त्वाचा सल्ला : केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेच घ्या आणि औषधांचा कोर्स पूर्ण करा. अर्धवट औषधोपचार शरीरातील जंतूंना अधिक शक्तिशाली बनवतो.

सतर्कता हेच सुरक्षा कवच

२०२५ मधील आरोग्य संकटांनी आपल्याला शिकवले आहे की, 'प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही चांगला'. जर आपण २०२६ मध्ये स्वच्छता, पूर्ण लसीकरण आणि योग्य वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीचा अवलंब केला, तर आपण येणाऱ्या वर्षात रोगांचा प्रादुर्भाव निश्चितपणे कमी करू शकतो.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+