Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हिरवी, काळे की लाल द्राक्षे, पौष्टिकतेच्या बाबतीत कोणते चांगले , यापैकी कोणते खावे?

Black Vs green vs red grapes : सध्या हिवाळा सीझन संपत असून आता गर्मी वाढली आहे. सध्या मार्केटमध्ये द्राक्षेंची आवक वाढली आहे. या काळात तुम्हाला हिरवे, द्राक्षे, काळे द्राक्षे आणि लाल द्राक्षे सहज आणि अगदी स्वस्त मिळू शकतात.

द्राक्षे, मग ती आंबट असो वा गोड, आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला अनेक फायदे देतात. तज्ञाच्या मते, हिरव्या द्राक्षांपेक्षा लाल द्राक्षे अधिक फायदेशीर मानली जातात.

Black Vs green vs red grapes

लाल द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली निरोगी ठेवण्यास आणि त्याशी संबंधित आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात. हे द्राक्ष रक्त गोठण्याची समस्या दूर करण्यास देखील सक्षम आहे. म्हणून जर तुम्ही तुमच्या आहारात लाल द्राक्षे समाविष्ट केली तर तुम्ही हृदयरोग टाळू शकता. नियमित सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि एकूण आरोग्य सुधारते.

लाल द्राक्षे

द्राक्षे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. विशेषकरुन मधुमेहाच्या रुग्णांसाठी. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. हे साखरेचे प्रमाण कमी करण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. लाल द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते. जे पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.

याशिवाय लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात, हाडे मजबूत करण्यात आणि शरीर निरोगी ठेवण्यात हे महत्त्वाची भूमिका बजावतात. नियमित सेवनाने एकूण आरोग्य चांगले राहू शकते.

काळी द्राक्षे

काळी द्राक्षे पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. काळी द्राक्षे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कारण त्यात रेझवेराट्रोल आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

ही द्राक्षे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. कारण त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमक देतात आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात. याशिवाय त्यात असलेले व्हिटॅमिन ए आणि सी डोळ्यांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात.

हिरवे द्राक्षे

तज्ञांच्या मते हिरव्या द्राक्षांमध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामध्ये व्हिटॅमिन बी-6, पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक असतात, जे शरीराच्या एकूण आरोग्याला चालना देतात.

हिरवी द्राक्षे टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांनी देखील उपयुक्त ठरू शकतात. त्यात रेझवेराट्रोल नावाचा रासायनिक घटक असतो. जो शरीरातील फॅटी ऍसिडच्या चयापचयाला चालना देतो आणि उर्जेची पातळी वाढविण्यास मदत करतो. वजन कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. अशाप्रकारे, लाल आणि हिरवी दोन्ही द्राक्षे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. या द्राक्षांचा आहारात समावेश करणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. हिरव्या द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल, जीवनसत्त्वे सी आणि के भरपूर प्रमाणात असतात, जे रक्त गोठण्यास प्रतिबंधित करतात आणि ऊतींना बरे होण्यास मदत करतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+