Health news marathi : सावधान! लघवीतील 'हे' 5 बदल देतात किडनी फेल्युअरचे संकेत! सावध व्हा; नाहीतर..
Health news marathi 5 Early Signs of Kidney Damage in Urine : आपल्या शरीरातील 'फिल्टर' म्हणून ओळखली जाणारी किडनी ज्याला मूत्रपिंड म्हटले जाते, हा अत्यंत महत्त्वाच्या अवयवापैकी एक आहे. रक्तातील विषारी घटक बाहेर काढून शरीर शुद्ध ठेवण्याचे काम किडनी करते. मात्र, आजकालची धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण चिंताजनक रसायने वाढत आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे किडनी कधीही अचानक निकामी होत नाही; ती खराब होण्यापूर्वी शरीराला काही संकेत देते. विशेषतः तुमच्या लघवीमध्ये होणारे बदल हे किडनीच्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगून जातात. जर तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
किडनी डॅमेजची ५ प्रमुख लक्षणे
१. वारंवार लघवीला होणे (विशेषतः रात्री)
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर तुम्हाला अचानक नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला जावे लागत असेल, तर हे किडनीच्या फिल्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षण असू शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी वारंवार झोपेतून उठावे लागणे हे किडनी डॅमेजचे प्रारंभिक लक्षण मानले जाते.
२. लघवीमध्ये फेस येणे
लघवी करताना जर भांड्यात साबणाच्या फेसासारखा जास्त फेस जमा होत असेल, तर याचा अर्थ तुमच्या लघवीतून 'प्रोटिन' (अल्ब्युमिन) बाहेर पडत आहे. या स्थितीला वैद्यकीय भाषेत 'प्रोटीनूरिया' म्हणतात. हे किडनी गाळण्याची प्रक्रिया नीट करत नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
३. लघवीचा रंग बदलणे
तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा, तपकिरी किंवा लालसर होत असेल, तर सावधान! लघवीतून रक्त येणे हे किडनी इन्फेक्शन, स्टोन किंवा किडनी निकामी होण्याचे गंभीर लक्षण असू शकते. अशा वेळी घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे जाणेच हिताचे ठरते.
४. लघवीला उग्र वास येणे
जेव्हा किडनी विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) फिल्टर करू शकत नाही, तेव्हा हे पदार्थ शरीरात साचतात. यामुळे लघवीला एक प्रकारचा वेगळा आणि खूप उग्र दुर्गंध येऊ लागतो. हा बदल जाणवल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.
५. लघवी करताना जळजळ किंवा वेदना
लघवी करताना होणारी जळजळ केवळ उष्णता नसून, ती किडनी किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे (UTI) लक्षण असू शकते. किडनीवर सूज किंवा इजा असल्यास यूरिन पास करताना तीव्र वेदना जाणवू शकतात.
आरोग्यासाठी महत्वाचा सल्ला
किडनीचे आजार हे अनेकदा 'सायलेंट किलर' असतात. त्यामुळे लघवीतील बदलांसोबतच डोळ्यांखाली सूज येणे किंवा पाय सुजणे अशी लक्षणे दिसल्यास उशीर करू नका, हे आरोग्याला धोका पोहचवणारे संकेत असू शकतात.












Click it and Unblock the Notifications