Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Health news: बाजारात येतोय बनावट मध! शुध्द आणि भेसळयुक्त मध कसा ओळखायचा? बोगस मधाचे धोके जाणून घ्या

Health news : मध हा आरोग्यदायी आणि गुणकारी पदार्थ आहे. मधाचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणात होते. मध हा पचनालाही फायेशीर असतो. अशातच मध खरेदी करताना अनेकजण गंभीर असतात परंतु नेमका खरा मध कोणता आपण खरेदी करतो तो बनावट तर मध नाही ना अशी अनेकांना शंका येते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक ठिकाणी मधात भेसळ केली जाते. भारतातच नाही तर अनेक देशात ही भेसळ केली जाते. अलिकडे तुर्कीयेमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मध जप्त करण्यात आला. ज्याची किंमत सुमारे 25 दशलक्ष युरो इतकी आहे. 2020 मध्ये, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) ने एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये देशातील अनेक प्रमुख ब्रँडमधील मध भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. 77 टक्के नमुने चाचणीत फेल ठरले.

Health news How to verify pure and adulterated honey

मधात कशाची असते भेसळ?

जास्त नफा मिळवण्यासाठी, भेसळ करणारे मधात साखर, गुळ, ग्लुकोज सिरप, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, पाणी, मोलॅसिस किंवा स्टार्च सिरप घालतात. ते नैसर्गिक मधासारखे दिसते आणि चवीलाही, पण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

भेसळयुक्त मधाचे आरोग्यावर परिणाम काय होतात?

भेसळयुक्त मध खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. एका अभ्यासानुसार, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा होतो. याशिवाय, यकृत, मूत्रपिंड, हृदय आणि मेंदूवरही त्याचा वाईट परिणाम होतो. याव्यतिरिक्त, पचन समस्या आणि पुरळ, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या ऍलर्जी देखील होऊ शकतात.

भेसळयुक्त मध कसा ओळखावा?

मधाची जाडी : खरा मध जाड आणि चिकट असतो, तर भेसळयुक्त मध पातळ असतो आणि लवकर वाहून जातो.
चव आणि सुगंध: खऱ्या मधात सौम्य गोडवा आणि फुलांचा सुगंध असतो. भेसळयुक्त मध खूप गोड असतो आणि त्याला कोणताही सुगंध नसतो.

मधाची चाचणी : FSSAI ने मध ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती चाचण्या सुचवल्या आहेत, यामध्ये मध पाण्यात मिसळणे होय.

मध खरेदी करताना काळजी : मध खरेदीवेळी पॅकिंगवरील FSSAI लोगो आणि शुद्धतेशी संबंधित माहिती तपासा.

मधाचा रंग : फिकट पिवळ्या ते गडद तपकिरी असू शकतो, परंतु असामान्य चमक भेसळीचे लक्षण असू शकते. शुद्ध मध जास्त महाग असतो म्हणून खूप स्वस्त मध खरेदी करू नका.

बिगर पॅकिंगचा मध खरेदी करणे सुरक्षित आहे का?

आहारतज्ज्ञ सांगतात की, स्थानिक मधमाश्या पाळणाऱ्यांकडून मध खरेदी करणे चांगले असू शकते, पण त्यांनी स्वच्छतेचे निकष पाळले असेल आणि सुयोग्य काळजी घेतली तरच त्यांच्याकडून मध खरेदी करायला हवा असे तज्ज्ञ सांगतात.

तक्रार कशी करावी?

कोणत्याही ब्रँड किंवा दुकानातून मधात भेसळ असल्याचा संशय आल्यास, FSSAI हेल्पलाइन किंवा तुमच्या राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन (FDA) कार्यालयात तक्रार दाखल करता येईल. त्याचा अहवाल ऑनलाइन पोर्टल किंवा जिल्हा प्रशासनाच्या मदतीने देखील दाखल करता येतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+