सावधान वातावरण बदलतयं..! डेंग्यूच्या रुग्णाला 'हे' पदार्थ खायला देऊ नका, नाहीतर बिघडू शकते तब्येत
Health News Tips For Dengue Patients : पावसाळा संपलाय, आता हिवाळ्याचे वेध लागले आहेत पण मध्येच गरमीही होतेय म्हणजेच ऑक्टोबर हीटचा त्रासही जाणवत आहे. त्याचमुळे वातावरणात बदल होत असून यापासून आपण काळजी घेण्याची गरज आहे. दुसरी बाब हि की डेंग्यू हवामान बदलले की हा आजार डोके वर काढतो. विशिष्ट प्रकारच्या डासांपासून हा आजार होत असतो आणि त्यामुळे डेंग्यूचे रूग्णही आता वाढत आहे.
या पार्श्वभुमीवर डेंग्यूच्या रुग्णांची कशी काळजी घ्यावी, डेंग्यूपासून लवकर बरे होण्यासाठी आहार कसा असावा हे महत्वाचे आहे. आहार घेताना खूप काळजी घ्यावी लागते. डेंग्यूच्या वेळी काय दिले पाहिजे याची जाणीव तुम्हाला असलीच पाहिजे आम्ही आज यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.

डेंग्यूची लागण झाल्यानंतर काही खाद्यपदार्थ आहेत जे खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते. डेंग्यूच्या रुग्णांना देऊ नये अशा गोष्टींची यादी येथे आहे:
तळलेले आणि मसालेदार पदार्थ
- तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो.
- ज्यामुळे पोटाचा त्रास, गॅस, ऍसिडिटी किंवा अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स
- चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स यासारखी चहा आणि कॉफी कॅफिनयुक्त पेये निर्जलीकरणास कारणीभूत ठरू शकतात, जे डेंग्यूच्या रुग्णासाठी हानिकारक असू शकतात.
चरबीयुक्त अन्न
- डेंग्यूच्या रुग्णाचे यकृत आधीच कमकुवत असते, अशा परिस्थितीत लोणी, तूप आणि मलई इत्यादी चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने यकृताच्या कार्यावर वाईट परिणाम होतो.
- पॅकबंद आणि प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये मीठ, साखर आणि संरक्षक पदार्थ जास्त प्रमाणात असतात, जे शरीराला हानी पोहोचवू शकतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात.
गडद रंगाची फळे आणि भाज्या
डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी करतात, म्हणून काही गडद रंगाची फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने रक्त पातळ होण्याचा धोका वाढू शकतो, जसे की पालक, बीटरूट, टोमॅटो. जास्त साखर खाऊ नका, जास्त साखर शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते आणि सूज वाढवू शकते, जे डेंग्यूच्या रुग्णासाठी हानिकारक असू शकते.
या गोष्टी टाळण्यासोबतच, डेंग्यूच्या रुग्णाला हलका आणि पौष्टिक आहार द्यावा, ज्यामध्ये फळे, भाज्या आणि द्रव पदार्थांचा भरपूर समावेश असावा ज्यामुळे शरीराला ऊर्जा आणि हायड्रेशन मिळू शकते.












Click it and Unblock the Notifications