Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हलक्या थंडीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा प्या, या 3 गोष्टी मिसळा सर्दी-खोकला दूर राहील

सध्या राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यासोबतच थंडी ही वाढण्यास आत सुरुवात झाली आहे. बदलत्या हवामानाचा प्रतिकारशक्तीवर अधिक परिणाम होतो. हलक्या थंडीत अन्नाचीही विशेष काळजी घ्यावी लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी चे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही ब्लॅक टीमध्ये असे मसाले आणि औषधी वनस्पती घालावेत, ज्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स तसेच पोषक तत्वे असतात. चला जाणून घेऊया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या ऋतूत ब्लॅक टीचे सेवन करावे का?

या 3 गोष्टी चहामध्ये मिसळा

ब्लॅक टी आरोग्यासाठी फायदेशीर बनवण्यासाठी त्यात आलं, दालचिनी आणि लवंगा घालता येतात. हे तिन्ही अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असतात. जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात.

Black Tea

ब्लॅक टी पिण्याचे फायदे -

ब्लॅक टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. काळ्या चहाचे नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित करतात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.

- ब्लॅक टी मेटाबॉलिज़्म वाढवते आणि चरबी कमी करण्यासाठी मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

- काही संशोधनाच्या दाव्यानुसार ब्लॅक टीमुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

- काळ्या चहामध्ये टॅनिन असते, जे पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते. व गॅस्ट्रिक समस्यांपासून आराम देते.

- यामध्ये असणारे अमीनो ॲसिड, एल-थेनाइन, तणाव आणि चिंता कमी करण्यास आणि मन शांत ठेवण्यास मदत करतात.

- काळ्या चहामध्ये अँटीव्हायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि सामान्य रोग टाळण्यास मदत करतात.

- यामध्ये आढळणारे फायटोकेमिकल्स हाडे मजबूत ठेवण्यास आणि हाडांची घनता राखण्यास मदत करतात.

- काळ्या चहामध्ये कॅफिन असते, म्हणून ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+