अरे बाप! 10 वर्षीय मुलीच्या पोटात अर्धा किलो केसांचा गोळा, ती केस खायची, नेमका काय आहे आजार?
10 year old girl hairball stomach : महाराष्ट्रातील अमरावती शहरात एका 10 वर्षांच्या मुलीने पचनसंस्थेशी संबंधित समस्यांची तक्रार केल्यानंतर तिच्या पोटातून सुमारे अर्धा किलो केसांचा गोळा काढण्यात आला आहे. मुलीने डॉक्टरांना सांगितले की तिला बऱ्याच काळापासून केस खाण्याची सवय आहे, असे अल्पवयीन मुलीवर शस्त्रक्रिया झालेल्या एका खाजगी रुग्णालयातल्या बालरोग शल्यचिकित्सक डॉ. उषा गजभिये यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तिला उलट्या, भूक न लागणे आणि वजन कमी करण्याच्या तक्रारींसह मुलीला २० दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आले होते, वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनानंतर मुलीने डॉक्टरांना सांगितले की ती केस खात असे.
वैद्यकीय तपासणीतून असे दिसून आले की तिच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला आहे, अखेर तिचे ऑपरेशन करून तिच्या पोटातील केसांचा गोळा काढण्यात आला. आता मुलगी आता व्यवस्थित खाऊ शकते आणि तिला इतर कोणताही त्रास नाही,
दरम्यान, अशीच घटना, वर्षभरापूर्वी देखील घडली होती, बरेली येथे राहणारी तरुणी वयाच्या १६ वर्षापासून स्वत:चेच केस खात होती. याआधीही अशाप्रकारच्या घटना समोर आल्या असून महिलांच्या पोटातून केसांचे गुंते शस्त्रक्रिया करुन काढण्यात आले आहेत.
त्यावेळी डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार, सदर तरुणीला ट्रायकोटोलोमॅनिया नावाचा मानसिक आजार असल्याचे समोर आले. चला तर नेमकं जाऊन घेऊया, काय आहे हा आजार आणि त्यावर उपाय काय केला जातोय.

मुलीला दोन मानसिक आजार!
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, ट्रायकोटिलोमॅनिया आणि पीआयसीए या दोन वेगवेगळ्या मानसिक आरोग्य स्थिती आहेत. जर तुम्हाला OCD (ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर), नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्या असतील तर धोका जास्त असतो.
तर, PICA सहसा लहान मुले आणि गर्भवती महिलांना होतो. काही लोकांना एकाच वेळी या दोन्ही मानसिक आरोग्य समस्या असू शकतात. ज्या मुलीच्या पोटात केसांचा गुच्छ आढळला ती एकाच वेळी दोन्ही आजारांनी ग्रस्त असण्याची शक्यता वर्तविली जाते.
या आजारांची लक्षणे काय?
- वारंवार केस उपटणे
- केसांचे लहान तुकडे करणे
- चेहरा आणि ओठांवर केस घासणे
- नेहमी विशिष्ट पॅटर्नमध्ये केसांशी खेळणे
- आपले केस चावण्याचा प्रयत्न करणे
- केस उपटता न आल्याने चिडचिड
- केस ओढून आनंद वाटतो.
PICAचे हे आहेत लक्षणे!
- रक्ताची कमी किंवा अॅनिमियासारखी लक्षणे
- माती, कागद आणि केस खाण्याची इच्छा
- शरीरात लोह आणि झिंकची तीव्र कमतरता
- केस, माती वगैरे खाल्ल्याने नेहमी पोट दुखण्याची समस्या
- साधारण जेवण जसे की भाजी, धान्य खाण्याची इच्छा न होणे.
प्रथम ट्रायकोटिलोमॅनियाची लक्षणांविषयी जाणून घेऊया..!
ट्रायकोटिलोमॅनिया आणि पीआयसीए वर उपचार काय आहेत?
ट्रायकोटिलोमॅनिया ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे. म्हणून, त्याच्या उपचारासाठी सामान्यतः काही थेरपी वापरल्या जातात.
कॉग्निटिव बिहेवियरल थेरपी (CBT)
ही सर्वोत्तम उपचार पद्धती मानली जाते. यामध्ये व्यक्तीच्या सवयी आणि विचार करण्याची पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला जातो.
हॅबिट रिव्हर्सल थेरेपी (HRT)
यामध्ये, व्यक्तीला केस ओढण्याच्या जागी स्पंज बॉल पिळणे किंवा रबर बँड ओढणे यासारख्या सुरक्षित सवयीचे प्रशिक्षण दिले जाते.
माइंडफुलनेस ट्रेनिंग (ध्यान)
हे विविध ताण व्यवस्थापन तंत्रे शिकवते आणि ध्यान आणि योगाची देखील शिफारस करते.
PICA वर उपचार काय आहे?
PICA चा उपचार जितक्या लवकर सुरू होईल तितके ते बरे करणे सोपे होईल. समजा, एखाद्याने रंग खाल्ला आणि त्यामुळे पोटात संसर्ग झाला, तर डॉक्टर चिलेशन थेरपी देऊन ते मूत्राद्वारे काढून टाकू शकतात. पण ही प्रक्रिया जितकी विलंबित होईल तितकी समस्या वाढत जाईल.
जर तुमच्या डॉक्टरांना तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा असंतुलन आढळले तर ते उपचार म्हणून जीवनसत्त्वे, लोह किंवा इतर पूरक औषधे लिहून देऊ शकतात. जर यामागील कारण मानसिक विकार असेल तर डॉक्टर तुम्हाला क्लिनिकल मानसशास्त्रज्ञांकडून थेरपी घेण्यास सांगू शकतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, रुग्णांना एकाच वेळी थेरपी आणि औषधे दिली जातात.












Click it and Unblock the Notifications