Weight Loss Tips : अदरकचे पाणी की मेथीचे पाणी, पोटाची चरबी वितळण्यासाठी काय प्यावे?
Weight Loss Tips : आपण वजन कमी करण्यासाठी अनेक युक्त्या लढवतो असतो. त्यासाठी काही शॉटकटचा ही वापर करतो. मात्र वजन काही कमी होत नाही. पोटाचा घेर कमी करण्यासाठी अनेक गोष्टी करतो. डाएट कंट्रोल व्यतिरिक्त बरेच लोक डिटॉक्स वॉटर देखील पितात. त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि चयापचय (Metabolism) क्रियांना चालना मिळते. मेथी आणि अदरक दोन्ही वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात, परंतु कोणता अधिक प्रभावी आहे? जर तुमचा या बाबत संभ्रम असेल तर दोघांची तुलना करूया.
तसे तर अदरक पाणी आणि मेथीचे पाणी या दोन्हीमध्ये एन्झाइम आढळतात. जे वजन कमी करण्यासाठी ओळखले जातात. मग या दोघांपैकी तुमच्यासाठी फायदेशीर आहे ते आपण जाणून घेऊया?

अदरक पाणी : अदरक हे थर्मोजेनिक अन्न आहे,याचा अर्थ ते शरीरातील चयापचय गतिमान करते. हे पोटाची सूज कमी करते, ज्यामुळे तुमचे पोट कमी फुगलेले दिसू शकते.
चयापचय (मेटाबॉलिज्म) वाढवून चरबी लवकर बर्न करण्यास मदत करते.पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. भूक नियंत्रित राहते, ज्यामुळे तुम्हाला तुमचा आहार कमी होईल.
मेथीचे पाणी : मेथीमध्ये विरघळणारे फायबर असते, जे जास्त काळ पोट भरते आणि भूक कमी करते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे चरबीचा संचय कमी होतो.
लिवरची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे चरबीचे चयापचय वाढते. इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. जास्त वेळ पोट भरलेले राहते, ज्यामुळे जास्त खाण्याची शक्यता कमी होते.
दोन्ही पैकी अधिक प्रभावी काय ?
जर तुम्हाला झटपट परिणाम हवे असतील तर अदरकचे पाणी चयापचय वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे शरीरातील उष्णता वाढवून चरबी जाळण्यास मदत करते. जर तुम्ही दीर्घकालीन वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर मेथीचे पाणी चांगले असू शकते. हे रक्तातील साखर नियंत्रित करते आणि तुमची भूक कमी करते. ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
दोन्ही पेयाचे सेवन केले करु शकता. कारण दोन्ही पेयाचे वेग-वेगळे फायदे आहेत. अदरकचे पाणी एका वेळी आणि मेथीचे पाणी दुसऱ्या वेळी पिऊ शकता.यासोबतच,हेल्दी डाएट आणि नियमित व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल.












Click it and Unblock the Notifications