गणेश चतुर्थीला तुम्ही बाप्पाला भेसळयुक्त गुळाचा प्रसाद अर्पण तर करत नाही ना? असं ओळखा

Ganesh Chaturthi 2024 : सर्वांच्या आवडत्या गणरायाचे उद्या आगमन होत आहे. लोकांनी गणपती प्रतिष्ठापनेची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या आसन आणि प्रसादाची तयारी सुरू झाली आहे. या दिवशी बहुतेक घरांमध्ये गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून गुळाचे लाडू अर्पण केले जातात. तसेच गणपतीला आवडणा-या मोदकात देखील गूळ वापरला जातो. मात्र सध्या बाजारात नफा मिळवण्यासाठी नकली गूळ बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारात बिनदिक्कतपणे बनावट गूळ मिळत आहे. हा गूळ खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

आज आम्ही तुम्हाला खरा आणि नकली गुळ ओळखण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही विकत घेतलेला गूळ खरा आहे की नकली हे तुम्ही सहज शोधू शकता.

Modak

या गोष्टींची केली जाते भेसळ

गुळात भेसळ करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट मिसळले जात आहे. त्यामुळे गुळाचे वजन वाढून त्याचा रंग गुळासारखा दिसतो. असा गूळ खाल्ल्याने आरोग्याला मोठी हानी होते.

रंगावरुन ओळखा

गूळ खरेदी करताना नेहमी तपकिरी रंगाचा गुळ खरेदी करण्याचा प्रयत्न करा. पिवळा किंवा हलका तपकिरी रंगाचा गूळ खरेदी करू नका. उसाचा रस बराच वेळ उकळल्यानंतर त्यातील रासायनिक बदलांमुळे गुळाचा रंग गडद लाल व तपकिरी होतो. पिवळ्या किंवा लाल रंगाचा गूळ नकली असू शकतो.

पाण्यामुळे कळेल गूळ खरा की नकली

तुम्हाला बाजारात पांढरा, हलका पिवळा किंवा लाल रंगाचा नकली गुळ मिळतो. हा गूळ पाण्यात टाकल्यास भेसळयुक्त पदार्थ भांड्याच्या तळाशी स्थिरावतात, तर शुद्ध गुळ पाण्यात पूर्णपणे विरघळतो.

फक्त कडक गूळ खरेदी करा

गूळ खरेदी करताना नेहमी कडक गूळच खरेदी करा. मऊ असलेला गूळ अनेकदा बनावट असतो. कोटिंगवरुन गूळ खरा आहे की नकली हे ओळखू येते, ख-या गुळावर कोटिंग किंवा जास्त चमक नसते., जर तुम्ही भेसळयुक्त गुळाला हात लावला तर तुम्हाला अनेकदा हा चमकदार थर दिसेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+