Health and Fitness| नियमित व्यायाम करूनही वजन वाढले? ही असू शकतात कारण
मुंबई : आपलं शरीर तंदुरुस्त राहावं, असं प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी आपण व्यायाम आणि संतुलित आहार असे पर्याय अवलंबतो. वाढणार वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिममध्ये घाम गाळतात. बहुतांश वेळी यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, आजार दूर राहतात. परंतु, काही अपवादात्मक प्रकरणात सगळे उपाय करूनही वजन वाढताना दिसते.

हे नक्की आहे की, व्यामामामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन घटते, परंतु वजन वाढत असेल तर याची काही कारण असू शकतात तीच आपण जाणून घेऊयात.
शरीरावर मसल्स रुपात वाढणारे मांस:
व्यायाम अथवा जीम करून शरीरावर मसल्स निर्माण करण्याचा अनेकांचा उद्देश असतो. या काळात शरीरावर उपयुक्त मांस वाढते. परिणामी आपणास वजन वाढल्याचे दिसते. या काळात काहीजण प्रोटीन्स घेतात. शरीरावर वाढणार हे उपयुक्त मांस नक्कीच एक चांगला संकेत आहे. यामध्ये काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही.
विविध प्रकारचे प्रोटीन्स आणि उपाय:
जीम करणारे बरेच लोक प्रोटीन्स पावडर आणि नानाविध गोष्टींचा वापर करतात. यामुळे देखील आपले वजन वाढू शकते. या औषधामध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाण जास्त असते. याचा परिणाम वजन वाढण्यात होतो. त्यामुळे या प्रोटीन्सच योग्य प्राण ठरवणं गरजेचं आहे.
घामाद्वारे शरीरात पाण्याची कमतरता:
व्यायाम केल्यानंतर शरीरातून घाम बाहेर पडतो. त्यामुळे काही काळासाठी वजन घटल्यासारखे सारखे वाटते. अन्न, पाणी ग्रहण केल्यावर पुन्हा ते जैसे थे होते.
अधिकचे जेवण :
बहुतांश वेळा व्यायाम केल्यानंतर लोक एक प्रमुख चूक करतात ती अशी की भरपूर प्रमाणत अन्नग्रहण करतात. आपण फळे आणि भाजीपाला खाण्यावर अधिक जोर दिल्यास आपणास फरक नक्कीच दिसेल. अधिक गंभीर परिस्थिती उद्भवल्यास आपण आहार तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.












Click it and Unblock the Notifications