Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Early Menopause 40 वर्षांपूर्वीच मासिक पाळी थांबणे धोक्याचे संकेत! अर्ली मेनोपॉजची ही 5 कारणे, उपाय!

Early Menopause Causes Symptoms Treatment : प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात रजोनिवृत्ती येतेच; ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. साधारणपणे, 45 ते 50 या वयोगटात ही 'नैसर्गिक समाप्ती' अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक महिलांमध्ये ही प्रक्रिया 40 वर्षांपूर्वीच सुरू होत आहे! याला वैद्यकीय भाषेत 'अर्ली मेनोपॉज' किंवा प्रीमेच्युअर रजोनिवृत्ती म्हणतात. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, वेळेपूर्वी होणाऱ्या या बदलांचा महिलांच्या केवळ शरीरावरच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही खोलवर आणि गंभीर परिणाम होतो.

Early Menopause Causes Symptoms

महिलांच्या आरोग्यासाठी आणि जनजागृतीसाठी ऑक्टोबर महिना 'रजोनिवृत्ती जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने, ही 'मेनोपॉजची घंटा' वेळेआधीच का वाजते, यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत आणि यावर प्रभावी उपाययोजना काय करता येतील, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ऑक्टोबर महिना 'रजोनिवृत्ती जागरूकता महिना' म्हणून पाळला जातो, त्या निमित्ताने 'अर्ली मेनोपॉज'ची प्रमुख कारणे आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबद्दल माहिती जाणून घेऊया.

अर्ली मेनोपॉजची प्रमुख कारणे

1. सर्जिकल मेनोपॉज:

काही वैद्यकीय कारणांमुळे जेव्हा महिलेचे गर्भाशय किंवा अंडाशय शस्त्रक्रियेद्वारे काढावे लागते (उदा. अति रक्तस्राव किंवा औषधांनी नियंत्रित न होणारे असामान्य मासिक धर्म), तेव्हा शरीरातील इस्ट्रोजेनचे उत्पादन अचानक थांबते. यामुळे लगेचच रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागतात.

2. आनुवंशिक घटक

काही महिलांमध्ये वेळेपूर्वी रजोनिवृत्ती होण्याचे कारण आनुवंशिक असू शकते. कुटुंबात (आई, आजी किंवा बहिणीला) जर लवकर मेनोपॉज झाला असेल, तर पुढील पिढीतील महिलांमध्येही तो लवकर होण्याची शक्यता बळावते. यात इस्ट्रोजेनची पातळी हळूहळू कमी होते आणि ४० वर्षांपूर्वी मासिक पाळी थांबते.

3. ढासळलेली जीवनशैली आणि आहार

आजची धावपळीची आणि बदललेली जीवनशैली हे मोठे कारण आहे. धूम्रपान, मद्यपान, वाढता ताण (Stress) आणि व्यायामाचा अभाव यासारख्या सवयी इस्ट्रोजेनच्या पातळीवर परिणाम करतात. तसेच, जास्त प्रोसेस्ड फूड आणि पोषण नसलेला जंक फूडचा आहार देखील या स्थितीला हातभार लावतो.

4. हार्मोनल असंतुलन आणि आरोग्य समस्या

काही वेळेस थायरॉईड, पीसीओएस (PCOS) आणि ऑटोइम्यून विकारांमुळे अंडाशयाची कार्यक्षमता वेळेपूर्वीच संपुष्टात येते. ऑटोइम्यून आजारात जेव्हा रोगप्रतिकारशक्ती चुकून अंडाशयावर हल्ला करते, तेव्हा ते निष्क्रिय होतात आणि लवकर मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात.

5. कॅन्सर उपचार

कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर दिल्या जाणाऱ्या केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमुळे अंडाशयाचे मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे इस्ट्रोजेनचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी होते आणि महिलेला वेळेपूर्वी रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतो.

वेळेपूर्वी मेनोपॉज झाल्यास काय करावे? : उपाय

  1. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही थेरपी लक्षणांना नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
  2. जीवनशैलीत बदल: नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योगासने करणे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
  3. औषधी अन् डाॅक्टरांचा सल्ला : कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणे
  4. हे टाळा: धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  5. हे लक्षात ठेवा: वेळेवर वैद्यकीय तपासणी आणि योग्य उपचार घेणे, हाच या समस्येवर प्रभावी उपाय आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+