सावधान! थंडीत कान दुखतोय? 'या' 5 अचूक घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम; इन्फेक्शनचा धोकाही टळेल!
Ear Pain Home Remedies 5 Tips for Winter : हिवाळ्याची चाहूल लागताच अनेकांना एक त्रासदायक समस्या सतावू लागते, ती म्हणजे कानदुखी आणि खाज! कान हा शरीराचा अतिशय नाजूक भाग असल्याने, थंड हवा, सर्दी किंवा अस्वच्छतेमुळे होणारे दुखणे असह्य होते. अनेकदा औषधांऐवजी जुने, पण अत्यंत प्रभावी घरगुती उपाय जास्त लागू पडतात. जर तुम्हालाही इअरबड्स वापरण्याची किंवा सतत कान खाजवण्याची सवय असेल, तर थांबा! तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ५ असे सोपे उपाय, जे कानाची जळजळ, वेदना आणि खाज त्वरित शांत करतील.

अनेकजण इअरबड्स किंवा टोकदार वस्तू कान कोरण्यासाठी वापरतात, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो, त्यामुळे कोरफड आणि तुळशीसारख्या नैसर्गिक गोष्टींनी कानदुखीवर कसा नियंत्रण मिळवायचे हे जाणून घेऊया. या वेदनांपासून लगेच आराम मिळवण्यासाठी औषध घेण्याऐवजी, तुम्ही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय नक्कीच करू शकता.
थंडीतील कानदुखीसाठी ५ प्रभावी घरगुती उपाय
१. कोरफड
कोरफड खाज आणि जळजळ शांत करेल, कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे कानाच्या आतील जळजळ आणि खाज शांत करण्यास मदत करतात. ताजे कोरफड जेल काढून त्याचे काही थेंब हलक्या हाताने कानाच्या बाहेरील भागावर लावा. यामुळे खाज आणि वेदना कमी होण्यास त्वरित मदत मिळेल.
२. गरम आणि थंड शेक
थंडीत कान दुखत असल्यास, गरम आणि थंड शेक खूप फायदेशीर ठरू शकतो. एक स्वच्छ कपडा थंड किंवा कोमट पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि तो काही मिनिटे कानाच्या जवळ ठेवा. यामुळे सूज कमी होते आणि वेदनेतून लवकर आराम मिळतो.
३. च्युइंगम चघळा
ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण च्युइंग गम चघळल्याने कानावरील दबाव कमी होतो. विशेषतः थंडीत किंवा हवाई प्रवास करताना कानात होणाऱ्या वेदना आणि जडपणात यामुळे आराम मिळतो.
४. कोमट तेलाची मालिश
कानदुखी किंवा खाजेसाठी कोमट तेल वापरणे हा एक जुना आणि प्रभावी उपाय आहे. नारळ तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा टी ट्री ऑईल हलके कोमट करा आणि त्याचे १-२ थेंब कानाच्या आसपास लावा. तेल जास्त गरम नसावे याची काळजी घ्या. टीप: तेल थेट कानाच्या आत टाकू नका, फक्त बाहेरील बाजूला मालिश करा.
५. तुळशीचा देशी इलाज
तुळशी तिच्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणांसाठी ओळखली जाते. ती कानदुखी आणि इन्फेक्शनमध्येही आराम देते. काही तुळशीची पाने वाटून त्यांचा रस काढा आणि तो प्रभावित झालेल्या बाहेरील भागावर लावा. तुम्ही तुळशीचा रस नारळ तेलात मिसळूनही वापरू शकता. रस थेट इअर कॅनलमध्ये घालू नका.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. ही कोणत्याही वैद्यकीय सल्ला, तपासणी किंवा उपचाराचा पर्याय नाही. आरोग्यविषयक कोणत्याही समस्येसाठी नेहमी आपल्या डॉक्टर किंवा तज्ज्ञ आरोग्य सल्लागाराचा सल्ला घ्या.)












Click it and Unblock the Notifications