दिवाळीच्या काळात बाजारात 'नकली पनीर'चा धुमाकूळ! शुद्ध आणि निकृष्ट दर्जाचे पनीर कसे ओळखाल? या टीप्स
Diwali 2025 Paneer Adulteration Scam : दिवाळी, म्हणजे मेजवानी आणि स्वादिष्ट पदार्थांचा सण! या काळात प्रत्येक घरात पनीरचे खास पदार्थ बनवले जातात. पनीरची वाढती मागणी पाहता बाजारपेठेत सध्या भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पनीरचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत आहे. तुमच्या आरोग्याशी थेट खेळणारे हे 'नकली पनीर' कसे ओळखायचे आणि खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या ताटातील 'शाही पनीर' खरंच शाही आहे की, निकृष्ट?

सणासुदीच्या काळात अन्न आणि खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच संधीचा फायदा घेऊन काही लोक दुधाऐवजी वनस्पती तेल (पाम तेल), स्टार्च, दुधाची भुकटी (Skimmed Milk Powder) आणि कधीकधी रसायनांचा वापर करून 'अनलॉग पनीर' किंवा भेसळयुक्त पनीर तयार करतात. हे पनीर दिसायला आकर्षक असले तरी, त्याचे पौष्टिक मूल्य कमी असते आणि ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.
दिवाळीत 'नकली पनीर'चा धोका का वाढतो?
मागणीत वाढ: दिवाळीत पनीर, खवा आणि मिठाईची मागणी प्रचंड वाढते. या मागणीला पूर्ण करण्यासाठी काही उत्पादक कमी वेळेत आणि कमी खर्चात पनीर बनवण्याच्या नादात भेसळ करतात.
'अनलॉग पनीर'चा वापर: 'अनलॉग पनीर' हे कृत्रिम उत्पादन असून ते खऱ्या पनीरची नक्कल असते. हे खरे दुधाऐवजी स्वस्त वनस्पती तेल आणि स्टार्च वापरून बनवले जाते आणि त्याची विक्री शुद्ध पनीरच्या दरात केली जाते.
आरोग्यावर दुष्परिणाम: निकृष्ट दर्जाचे पनीर खाल्ल्यास पोटदुखी, ॲलर्जी, पचनाचे त्रास आणि फूड पॉयझनिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात.
भेसळयुक्त पनीर कसे ओळखावे? घरगुती सोप्या 'टेस्ट'
'रबर' टेस्ट (दाब चाचणी):
पनीरचा एक छोटा तुकडा हातावर घ्या आणि हलका दाब देऊन चोळा.
शुद्ध पनीर: ते सहजपणे विलग होणार नाही किंवा लगेच तुटणार नाही. ते मऊ आणि लवचिक (स्पंजसारखे) असेल.
भेसळयुक्त पनीर: ते लगेच मोकळे होऊन तुटते किंवा काही पनीर रबरासारखे चिकट आणि ताणले जाते.
उकळण्याची चाचणी (आयोडिन टेस्ट)
पनीरचा तुकडा पाण्यात टाकून उकळवा आणि नंतर तो थंड करा.
थंड झाल्यावर त्यावर आयोडिनचे काही थेंब टाका (आयोडिन टिंचर सहज उपलब्ध असते).
निकाल: जर पनीरचा रंग निळसर झाला, तर त्यात स्टार्चची भेसळ आहे, हे समजावे. शुद्ध पनीरवर आयोडिनचा रंग बदलत नाही.
रंग आणि वास
- शुद्ध पनीरचा रंग पांढरा शुभ्र आणि सुवास दुधासारखा असतो.
- निकृष्ट किंवा भेसळीच्या पनीरचा रंग पिवळसर किंवा त्याची चव/वास थोडा खवट किंवा कृत्रिम असू शकतो.
तुम्ही काय काळजी घ्याल?
दिवाळीच्या काळात पनीर खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह आणि नामांकित दुकानांमधून किंवा ब्रँडेड कंपनीचे सीलबंद पनीर खरेदी करा. पॅकिंगवरील 'उत्पादनाची तारीख' आणि 'एक्सपायरी डेट' तपासणे अनिवार्य आहे.












Click it and Unblock the Notifications